शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे राज्यात ९३ रेशन दुकानदारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या महामारीत पूर्ण वर्ष गेले. यावेळी अत्यावश्यक सेवा म्हणून रेशन दुकानदारांनी मोठी जबाबदारी पार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या महामारीत पूर्ण वर्ष गेले. यावेळी अत्यावश्यक सेवा म्हणून रेशन दुकानदारांनी मोठी जबाबदारी पार पाडली. रेशन दुकानदारांमुळेच शासनाचे मोफत धान्य गरिबांपर्यंत पोहोचू शकले. शासनानेही ही बाब मान्य केली. ही सेवा देत असतानाच राज्यभरात तब्बल ९३ रेशन दुकानदारांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला. केवळ ९३ दुकानदार नव्हे; तर ९३ कुटुंब रस्त्यावर आली. त्यामुळे या मृत रेशन दुकानदारांच्या परिवारालाही पोलीस व डॉक्टर यांच्या धर्तीवर ५० लाखांचा सुरक्षा विमा लागू करावा, अशी मागणी विदर्भ रास्त भाव दुकानदार, केरोसीन विक्रेता संघटनेने केली आहे.

संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहारही केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कोणतीही व्यक्ती धान्यापासून वंचित राहू नये म्हणून केंद्र शासनाने रेशन दुकानदारांद्वारे वितरणाची व्यवस्था सुरू ठेवली. महामारीच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता रेशन दुकानदारांनी धान्याचे वितरण केले. यामुळे अनेक दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह झाले. राज्यातील जवळपास ९३ रेशन दुकानदारांचा कोरोनाने मृत्यू झाला. यात सर्वाधिक पुणे विभागातील ३२, मुंबईतील २६, रायगडमध्ये ८, नागपुरात ६ आणि अमरावतीतील ८ दुकानदारांचा समावेश आहे. कोरोना काळात पोलीस आणि डॉक्टर यांना काेरोना योध्दे म्हणून मृत्यूनंतर ५० लाखांचे विमा सुरक्षा कवच देण्यात आले आहे. मग हे विम्याचे कवच रेशनदुकानदारांना लागू का नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.