शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोरोना ‘जेएन.१ व्हेरियंट’चा २०रुग्णांची नोंद; २ रुग्ण ग्रामीणमधील, ८ बरे, १२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये 

By सुमेध वाघमार | Updated: January 5, 2024 20:17 IST

विदर्भात अकोलानंतर नागपुरात  कोरोनाचा ‘जेएन.१’ व्हेरियंटचे रुग्णांची नोंद झाली.

नागपूर : विदर्भात अकोलानंतर नागपुरात  कोरोनाचा ‘जेएन.१’ व्हेरियंटचे रुग्णांची नोंद झाली. तब्बल २० रुग्ण आढळून आले. यातील ८ बरे झाले असून १२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचाराखाली आहेत. या ‘अ‍ॅक्टीव्ह’ रुग्णांना सौम्य लक्षणे असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, यात ११ महिला आहेत.

कोरोनाचा ‘जेएन.१’ व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी कोरोना संशयीत व सौम्य लक्षणे आढळणाºया रुग्णांची चाचणी करा, अधिकाधिक चाचणी करण्यावर भर द्या, असे निर्देश प्रशासनाने आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यानुसार चाचण्यांचा वेग वाढविण्यात आला. परंतु मागील आठवड्याभरात कोरोना रुग्णांची संख्या दहाच्या खाली होती. या दरम्यान आरोग्य विभागाने संशयित ४२ रुग्णांचे नमुने ‘नीरी’च्या प्रयोगशाळेत ‘जीनोम सिक्वेन्सिंग’साठी पाठविण्यात आले. यात ‘जेएन.१’ व्हेरिएंटचे शहरात १८ तर ग्रामीणमध्ये २ असे एकूण २० रुग्णांची नोंद झाली. 

१२ ते ८४ वयोगटातील रुग्णआढळून आलेल्या ‘जेएन.१’ व्हेरिएंटचा रुग्णांमध्ये ११ महिला व ९ पुरुष आहेत. महिलांमध्ये १२, १५, २५, २९, ४०, ४५,५०, ५८,६८ व ७० तर, पुरुषांमध्ये १३, ४५, ५५, ५९, ७८ व ८४ वयोगटातील रुग्ण आहेत. यातील एकाही रुग्णाला हॉस्पिटलची गरज पडली नाही. यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. 

पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणीमनपा आरोग्य विभागामार्फत ‘जेएन.१’ पॉझिटीव्ह रुग्णांच्या घरी भेटी दिल्या जाणार असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांची कोरोना चाचणी करणार असल्याची माहिती आहे. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी सांगितले, अ‍ॅक्टीव्ह रुग्णांना सौम्य प्रकारची लक्षणे आहेत. सर्वच रुग्ण घरी उपचाराखाली आहेत. यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. लक्षणे दिसताच मनपाच्या ‘युपीएचसी’मधून नि:शुल्क तपासणी करून उपचार घ्यावेत.

घाबरू नका, काळजी घ्या‘जेएन.१’चा रुग्णांची संख्या व लक्षणे पाहता घाबरुन जाण्याची गरज नाही. जे रुग्ण ‘अ‍ॅक्टीव्ह’ आहेत त्यांना सौम्य प्रकारची लक्षणे आहेत. परंतु खबरदारी म्हणून गर्दीचे ठिकाण टाळायला हवे. गर्दीत जाणे गरजेचे असल्यास मास्कचा वापर करायला हवा. विशेषत: वृद्धांनी कोरोनाचा नियमाचे पालन करायला हवे. वारंवार हात धुणे, डोळ्याला, नाकाला हात न लावणे, अंतर ठेवणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे. -डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :nagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या