शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

नागपुरात खासगी रुग्णालयात कोरोना संक्रमित वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 07:00 IST

सध्या शहरातील ६ खासगी रुग्णालयात २९६ बेड कोरोनाच्या रुग्णावर उपचारासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत या रुग्णालयांमध्ये ९८ बेड रिकामे होते.

ठळक मुद्देबेड नसल्याचे सांगून भरती करण्यास देताहेत नकाररेट चार्ट व बेडची स्थितीचा फलकही दिसेना

राजीव सिंहलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना पॉझिटिव्हच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारी रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयांनाही संक्रमितांवर उपचार करण्यास परवानगी दिली आहे. सध्या शहरातील ६ खासगी रुग्णालयात २९६ बेड कोरोनाच्या रुग्णावर उपचारासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत या रुग्णालयांमध्ये ९८ बेड रिकामे होते. तरीसुद्धा कोरोनाचे रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी आल्यास त्यांना भरती करून घेण्यास टाळले जात आहे. रुग्णाने रुग्णालय सांगेल तेवढी फी भरावी व उपचार घ्यावेत यासाठी काही ठिकाणी रुग्णांना दिवसभर बसवून ठेवण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची चांगलीच अडचण होत आहे.विशेष म्हणजे मनमानी फी वसूल करणे व नियमांचे पालन न केल्याप्रकरणी मनपा प्रशासनातर्फे वोक्हार्ट रुग्णालय व सेव्हन स्टार रुग्णालयावर आधीच कारवाई करण्यात आली आहे. तरीसुद्धा खासगी रुग्णालयांनी धडा घेतला नाही. नियमानुसार जेवढ्या खाटा कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी आरक्षित केल्या आहेत, त्यातील ८० टक्के रुग्णांकडून सरकारने ठरविलेल्या दरानुसार फी वसुली करायची आहे. उर्वरित २० टक्के खाटांवर रुग्णालय आपल्यास्तरावर शुल्क वसुली करू शकते. परंतु रुग्णालयात रुग्ण पोहचल्यानंतर बेड रिकामे नसल्याचे सांगण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात उत्तम सुविधा मिळेल, याच हेतूने रुग्ण जात आहेत. परंतु रुग्णालयांचा व्यवहार या आपत्तीच्या प्रसंगात रुग्णांसाठी वेदनादायी ठरत आहे. बहुतांश रुग्णालयात नियमांचे पालन करण्यात येत नसल्याचेही कळत आहे.

खासगी रुग्णालयातून येत असलेल्या तक्रारी लक्षात घेता, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अप्पर आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात विशेष पथक गठित केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात दररोज समीक्षा केली जात आहे. हे पथक कधीही रुग्णालयात पोहचून तपासणी करू शकते.मनपाकडे करा तक्रार, कारवाई होईल - शर्मामनपा अप्पर आयुक्त व विशेष पथकाचे प्रमुख जलज शर्मा म्हणाले, खासगी रुग्णालयात रोज भरती होणाऱ्या रुग्णांची माहिती घेतली जात आहे. सरकारकडून दर निश्चित करण्यात आले आहे. त्यापेक्षा जास्त दर आकारल्यास कारवाई करण्यात येणार आहे. दोन रुग्णालयांवर कारवाई झाली आहे. जेथे रुग्णांना त्रास होत आहे, रुग्णालयांकडून जास्त बिल वसूल केले जात आहे, त्यांनी मनपाला तक्रार करावी.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस