शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वाढला, सॅनिटायझरचा वापर घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 10:57 IST

Nagpur News सरकार कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात सॅनिटाईज करण्याच्या सूचना वारंवार करीत आले आहे. पोलीस कारवाईच्या भीतीपोटी लोकांनी मास्क घालणे सुरू केले. पण, सॅनिटायझरचा वापर लोकांनी टाळल्याचेच दिसून येते.

ठळक मुद्दे५० टक्केवर आली विक्रीसॅनिटायझर लोकांनी जवळ बाळगणे केले बंद

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २ हजारांवर गेला. सरकार कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात सॅनिटाईज करण्याच्या सूचना वारंवार करीत आले आहे. पोलीस कारवाईच्या भीतीपोटी लोकांनी मास्क घालणे सुरू केले. पण, सॅनिटायझरचा वापर लोकांनी टाळल्याचेच दिसून येते. शहरातील मेडिकल दुकानदारांकडून सॅनिटायझरच्या विक्रीचा आढावा घेतला असता, ५० ते ६० टक्केच विक्री होत असल्याचे सांगण्यात आले.

मार्च महिन्यात कोरोनाचा रुग्ण शहरात आढळला. त्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमध्ये शहरात कोरोनाच्या बाबतीत प्रचंड भीती निर्माण झाली होती. सुरुवातीच्या काळात लोकांनी नियमांचे पालन नियमित केले. सॅनिटायझरचा वापर घरोघरी व्हायला लागला होता. लोक बाहेर पडतानाही खिशात सॅनिटायझरची बाटली घेऊन पडायचे. बाहेरून कुणी आल्यावर त्याचे हात सॅनिटाईज केल्याशिवाय आत घेत नव्हते. तेव्हा सॅनिटायझरच्या किमतीही दुप्पट - तिप्पट होत्या. मेडिकल स्टोअर्स चालकांनी सॅनिटायझरच्या विक्रीतून त्या वेळी चांगलीच कमाई केली. पण, लॉकडाऊन हळूहळू मागे घेण्यात आला. कोरोनाचे रुग्णही कमी होत गेले. दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, खाजगी - सरकारी कार्यालये सुरू झाली. प्रवासी सेवा सुरळीत झाल्या आणि लोकही मोठ्या संख्येने बाहेर पडायला लागले. त्यामुळे हळूहळू कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष होत गेले. आतातर लोक सॅनिटायझरचा वापर अतिशय कमी करीत आहेत. खाजगी - सरकारी कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने अथवा दुकानांतच सॅनिटायझर वापरासाठी ठेवण्यात आले आहे.

- लोकांमधील भीती कमी झाली

सुरुवातीला लोकांनी सॅनिटायझर महाग असतानाही त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला. फार्मसीमध्ये येणारा प्रत्येक जण किमान छोटी बॉटल तरी घेऊन जात होता. आता छोट्या बॉटलचा सेल फार कमी झाला. १ ते ५ लीटरच्या सॅनिटायझरच्या कॅन काही लोक घेऊन जातात तसेच व्यापारी प्रतिष्ठाने अथवा कार्यालयांमध्येच आता सॅनिटायझरची विक्री होत आहे. लोकांमध्ये भीती कमी झाल्याचे फार्मासिस्टचे म्हणणे आहे.

- काळजी घेतल्यानंतरही कोरोना झालाच

लॉकडाऊनच्या काळात आम्ही नियमांचे पालन केले. घराबाहेर पडताना सॅनिटायझरची बॉटल, मास्क वापरले. कार्यालयातही काम करताना एखाद्या वस्तूला हात लागल्यानंतर लगेत हात सॅनिटाईज करून घ्यायचो. इतकी काळजी घेतल्यानंतरही कोरोना झालाच. आता मास्क वापरतो. पण, सॅनिटायझरचा अति वापर करीत नाही.

- राजेश राऊत, नागरिक

- लुझमध्ये आता वापर कमी झाला आहे. ५ लीटरच्या कॅन लोक नेतात. लोकांनी काळजी घेणे टाळल्यामुळे विक्रीत घट झाली आहे. पूर्वी सॅनिटायझरच्या किमती वाढल्या असतानाही लोकांची मागणी जास्त होती. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी, विक्री फार वाढलेली नाही. विशेष म्हणजे आता अनेक कंपन्यांचे सॅनिटायझर मार्केटमध्ये आहे. किमतीही कमी आहेत. मात्र, त्या प्रमाणात मागणी नाही.

- राजेंद्र कावडकर, अध्यक्ष, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस