शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कोरोनाचा विळखा होत आहे घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:09 IST

नागपूर : मागील दोन महिन्यांत कोरोनाचा सैल झालेला विळखा आता पुन्हा घट्ट होऊ लागला आहे. सोमवारी पुन्हा रुग्णसंख्येत वाढ ...

नागपूर : मागील दोन महिन्यांत कोरोनाचा सैल झालेला विळखा आता पुन्हा घट्ट होऊ लागला आहे. सोमवारी पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली. ४९८ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. ६ बाधितांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या १,३९,२५३ झाली असून, मृतांची संख्या ४,२३३ वर पोहोचली. विशेष म्हणजे, रुग्ण वाढत असताना संशयितांच्या तपासणीचे प्रमाण कमी झाले आहे. आज २,६३५ चाचण्या झाल्या. पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १८.८९ टक्के झाले आहे.

नागपूर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात दैनंदिनी २०० ते २५० दरम्यान बाधित आढळून येत होते, परंतु मागील आठवड्यापासून ४५० ते ५०० दरम्यान रुग्ण दिसून येत आहेत. या पाच दिवसांत २,२५८ नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे आरोग्य यंत्रणेतच नाही, तर सामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शाळा सुरू झाल्याने पालकांमध्ये काळजी वाढली आहे. आज २,११२ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. यातून ४६२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ५२३ रॅपीड अँटिजन चाचण्यामधून ३६ बाधित आढळून आले. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील ४३९, ग्रामीणमधील ५७ तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ३, ग्रामीणमधील १ तर जिल्ह्याबाहेरील २ मृत्यू आहेत. आज २८१ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही घसरले आहे. बरे होण्याचा दर आता ९३.९० वर आला आहे. सध्या ४,२६१ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील १,३२० रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात तर २,९४१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

- चाचण्या कमी, रुग्णांत वाढ

नागपूर जिल्ह्यात ११ फेब्रुवारी ५,०८५ चाचण्या झाल्या. यात ५०० रुग्ण पॉझिटिव्ह आले. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किमान चार ते आठ संशयितांच्या तपासण्या होणे आवश्यक होते, परंतु तसे झाले नसल्याचे दिसून येते. १२ फेब्रुवारी रोजी ४,५०६ चाचण्या झाल्या. यात ३१९ बाधित आढळून आले. १३ फेब्रुवारी रोजी चाचण्यात वाढ झाली. ४,७१९ चाचण्यांमध्ये ४८६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. १४ फेब्रुवारी रोजी कमी चाचण्या, ३,३३७ झाल्या असताना ४५५ रुग्णांची नोंद झाली, तर आज २,६३५ चाचण्यांमध्ये ४९८ रुग्ण आढळून आले. रुग्ण वाढत असताना चाचण्या कमी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासन ‘ट्रेसिंग’ व ‘टेस्टिंग’ला गंभीरतेने घेत नसल्याचे यावरून दिसून येते.

-क्षमतेपेक्षा कमी तपासण्या

कोरोनाचे नमुने तपासणीसाठी शहरात सहा शासकीयसह जवळपास दहावर खासगी प्रयोगशाळा आहेत. मेयो, मेडिकलमध्ये दैनंदिनी नमुने तपासणीची क्षमता प्रत्येकी ८००वर आहे. इतर प्रयोगशाळांची क्षमता २०० ते ४०० दरम्यान आहे, परंतु नमुनेच कमी येत असल्याने, या प्रयोगशाळेत कमी तपासणी होत असल्याचे दिसून येत आहे. मेडिकलमध्ये आज ६५५, मेयोमध्ये ५००, एम्समध्ये २५०, माफसूमध्ये शुन्य, निरीमध्ये १२५, नागपूर विद्यापीठामध्ये १९३ तर खासगी लॅबमध्ये ३८९ नमुने तपासण्यात आले.

कोरोनाची स्थिती

-चाचण्या-२,६३५

एकूण रुग्ण-१,३९,२५३

-बरे झालेले रुग्ण -१,३०,७५९

उपचार घेत असलेले रुग्ण-४,२६१

मृत्यू संख्या-४,२३३