शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालयातही होऊ शकते कोरोनाची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 11:24 IST

देशात विषाणूंचा वाढता विळखा लक्षात घेऊन केंद्राने राज्यातील नागपूरच्या मेडिकल येथे राज्यस्तरीय विषाणू संशोधन, निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अ‍ॅण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देविषाणू संशोधन प्रयोगशाळेला हवा बूस्टर डोज ‘डीएमईआर’ने लक्ष देणे गरजेचे

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात विषाणूंचा वाढता विळखा लक्षात घेऊन केंद्राने राज्यातील नागपूरच्या मेडिकल येथे राज्यस्तरीय विषाणू संशोधन, निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अ‍ॅण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) उभारण्याचा निर्णय घेतला. ‘इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) चमूने मेडिकलची पाहणीही केली. पहिल्या टप्प्यातला निधीही मिळाला. परंतु पुढील प्रक्रिया खोळंबली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने या प्रयोगशाळेला ‘बूस्टर डोज’ दिल्यास मेडिकलमध्येही कोरोना विषाणूचे नमुने तपासणे शक्य होईल.गेल्या वर्षी विदर्भात स्क्रब टायफस व डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. स्वाईन फ्लूची दहशत कायम आहेच. आता कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती वाढली आहे. पूर्वी या आजाराच्या संशयित रुग्णांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविले जात होते. दरम्यान, २०१३-१४ मध्ये दोन प्रादेशिक, चार राज्यस्तरीय व देशातील आठ विषाणू प्रयोगशाळेला मंजुरी देण्यात आली. यात महाराष्ट्राच्या वाट्याला नागपुरातील मेयोला ही विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा आली. परंतु निधी, आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध न झाल्याने काही चाचण्यांपुरतीच ही प्रयोगशाळा मर्यादित राहिली. गेल्या वर्षी पुन्हा केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागांतर्गत १२ व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत साथीचे आजार व नैसर्गिक आपत्ती यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रयोगशाळेचे जाळे निर्माण करण्याची योजना आखली. त्यानुसार महाराष्ट्रात ‘विषाणू संशोधन, निदान प्रयोगशाळा’ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यात नागपूरच्या मेडिकलला राज्यस्तरीय प्रयोगशाळा, तर औरंगाबाद, अकोला, धुळे आणि सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये महाविद्यालयस्तरीय प्रयोगशाळा स्थापन करण्याला मंजुरी देण्यात आली. सहा महिन्यांपूर्वी ‘आयसीएमआर’च्या द्विसदस्यीय चमूने मेडिकलची पाहणी करून मंजुरीचा अहवालही दिला. या प्रयोगशाळेचा खर्च केंद्र शासन उचालणार असून राज्याला केवळ जागा उपलब्ध करून द्यायचे होती. सूत्रानुसार, जागेला व प्रयोगशाळेला घेऊन सामंजस्य करार झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत यावर चर्चाही झाली. परंतु पुढील प्रक्रिया थंडबस्त्यात पडली आहे.काही तासांतच मिळेल अहवालकोरोना विषाणूचे सर्वाधिक संशयित रुग्ण मेडिकलमध्ये येत आहेत. आतापर्यंत ७४ नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. परंतु या प्रयोगशाळेत विदर्भासह आजूबाजूच्या राज्याच्या नमुन्यांचाही भार असल्याने तपासणीस उशीर होत आहे. मेडिकलची ही प्रयोगशाळा तातडीने सुरू झाल्यास याचा फायदा रुग्णांची उपचाराची दिशा ठरविण्यास होणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस