शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे विमानतळालगतच्या उंच इमारतींवर कारवाईला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 20:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या उंच इमारतींवर कोरोना महामारीमुळे कारवाई करण्यास विलंब होत असल्याची माहिती विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्दे २९ इमारती धोकादायक : इमारतींवर लवकरच कारवाई होणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या उंच इमारतींवर कोरोना महामारीमुळे कारवाई करण्यास विलंब होत असल्याची माहिती विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिली. उंच इमारतींमुळे विमानाचे लॅण्डिंग आणि उड्डाणाला धोका निर्माण होत असल्याचा अहवाल दोन वर्षांपूर्वीच प्राप्त झाला आहे, हे विशेष.अधिकारी म्हणाले, एमआयएलने दोन वर्षांपूर्वीच एका एजन्सीमार्फत विमानतळालगतच्या उंच इमारतींची पाहणी केली होती. कोणत्या इमारती धोकादायक आहेत, याचा अहवाल तयार करून डीजीसीएला पाठविला आहे. इमारतींवर कारवाई करण्याची प्रक्रिया मोठी आहे. या अंतर्गत इमारतींच्या मालकांना नोटीस देणे, स्वत: कारवाई करणे, मनपाच्या अधिकाºयांसोबत चर्चा करणे, डीजीसीएला अहवाल देणे आणि त्यांच्याकडून आदेश येणे आणि नंतरच कारवाई करणे ही प्रक्रिया आहे. यात वेळ लागणार आहे. नोटीस दिल्यानंतर इमारतींच्या मालकांकडून इमारत तोडण्यासाठी कारवाई सुरू आहे का, याची पाहणी सुरू करण्यात येणार होती. ही प्रक्रिया सुरू असतानाच मार्च महिन्यात लॉकडाऊन लागले. त्यामुळे ही प्रक्रिया थांबली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर पुन्हा पाहणी करून डीजीसीएला अहवाल देण्यात येणार आहे.विमानतळ प्रशासनाने कारवाईसाठी या इमारतींच्या मालकांना अनेकदा नोटिसा बजावल्या आहेत. विमानाला धोका असलेल्या २९ इमारतींची ओळख झाली आहे. या गंभीर समस्येवर एमआयएल आणि मनपाच्या अधिकाºयांमध्ये पूर्वी बैठक झाली आहे. उंचीचे उल्लंघन केलेल्या इमारतींचे बांधकाम तोडण्यात येण्यावर बैठकीत ठरले. विमानतळ परिसराच्या ठराविक अंतरावर बांधकाम करण्यात येणाºया इमारतींसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. हा नियम संपूर्ण देशात लागू आहे. प्राधिकरणाने विमानतळालगतच्या परिसरात इमारत बांधण्यासाठी उंची ठरवून दिली आहे. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन करून उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. उंचीसाठी मालकाने प्राधिकरणाची मंजुरी घेतलेली नाही. आता त्या विमानासाठी धोकादायक ठरल्या आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळालगतच्या उंच इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विमानतळ प्राधिकरणासह खासगी कंपनीतर्फेही इमारतींचे सर्वेक्षण करून एमआयएल आणि डीजीसीएला अहवाल सादर केला आहे. पण त्यानंतरही कारवाई झालेली नाही. मर्यादेपेक्षा जास्त उंच इमारतींच्या बांधकामाला प्राधिकरणाने परवानगी दिलीच नाही. अशा स्थितीत कारवाईसाठी प्राधिकरणाचे अधिकारी कुणाची वाट पाहत आहेत, हा गंभीर प्रश्न आहे. कारवाईसाठी स्थानिक प्रशासनाची मदत घेता येणार आहे.कारवाई होणारचविमानतळालगत उभ्या असलेल्या उंच इमारतींवर कारवाई करण्यात कोरोना महामारीमुळे विलंब झाला आहे. सर्वांना नोटिसा पाठविल्या आहेत. या इमारतींचा अहवाल डीजीसीएकडे पाठविला आहे. इमारतींचे मालक स्वत: काय कारवाई करतात, याकडे लक्ष आहे. पण या सर्व इमारतींवर कारवाई निश्चितच होणार आहे.आबीद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर