शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नागपूरच्या तुलनेत अमरावती विभागावर कोरोनाचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 12:24 IST

Nagpur News कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेला घेऊन बेफिकिरी वाढली आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे आणखी भर पडली. परिणामी, नागपूर व अमरावती विभागात रुग्णात वाढ झाली.

ठळक मुद्देनागपूर विभागात ४,५८२, अमरावती विभागात ५,७९७ नवे रुग्ण नागपूरसह वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ व बुलडाण्यात वाढले रुग्ण

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेला घेऊन बेफिकिरी वाढली आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे आणखी भर पडली. परिणामी, नागपूर व अमरावती विभागात रुग्णात वाढ झाली. नागपूरच्या तुलनेत अमरावती विभागात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. १० ते १८ फेब्रुवारीदरम्यान नागपूर विभागात ४,५८२ तर अमरावती विभागात ५,७९७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. धक्कादायक म्हणजे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील कोरोनाची स्थिती स्पष्ट करताना इतर जिल्ह्याच्या तुलनेत विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे सांगून धोक्याची सूचना दिली होती. मागील आठवड्यात याबाबतचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथकाने नागपूर व अमरावतीला भेट देत वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. त्यानंतर जागे झालेल्या आरोग्य प्रशासनाने प्रतिबंधक कठोर उपाययोजना हाती घेतल्या. परंतु वाढत्या रुग्णसंख्येत दोन्ही विभागात चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, अमरावती विभागातील रुग्ण नागपूर विभागात उपचारासाठी येत असल्याने संसर्ग पसरण्याची अधिक शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

- कोरानाचे असे वाढले रुग्ण

नागपूर विभागातील सहा जिल्हे मिळून १० फेब्रुवारी ४६९, ११ फेब्रुवारी ५७०, १२ फेब्रुवारी ४६७, १३ फेब्रुवारी ५६२, १४ फेब्रुवारी ५७०, १५ फेब्रुवारी ५४१, १६ फेब्रुवारी ६७३ तर १७ फेब्रुवारी ७३० असे एकूण ४,५८२ नवे रुग्ण आढळून आले. अमरावती विभागातील पाच जिल्हे मिळून १० फेब्रुवारी ५४५, ११ फेब्रुवारी ५१७, १२ फेब्रुवारी ६०४, १३ फेब्रुवारी ७२४, १४ फेब्रुवारी ७८६, १५ फेब्रुवारी ७०३, १६ फेब्रुवारी ८६५ तर १७ फेब्रुवारी १०५३ असे एकूण ५,७९७ रुग्णांची नोंद झाली.

-नागपूर विभागातील दोन तर अमरावती विभागातील चार जिल्ह्यांना धोका

मागील सात दिवसात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यापैकी नागपूर व वर्धा जिल्ह्यात रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. नागपूर जिल्ह्यात ३,७८० तर वर्धा जिल्ह्यात ५०३ रुग्णांची नोंद झाली. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यापैकी चार जिल्ह्यात रुग्ण वाढत आहेत. अमरावती जिल्ह्यात ३,२४७, अकोला जिल्ह्यात ९४४, बुलडाणा जिल्ह्यात ८१४ तर यवतमाळ जिल्ह्यात ६२० आढळून आले आहेत.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस