शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहर पोलिसात कोरोनाची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 22:03 IST

फुटबॉल खेळाडूच्या मृत्यूने शहर पोलिसातही कोरोना विषाणूच्या संसर्गाची चाहूल दिसून येत आहे. मृत युवकाचा काका हा बेलतरोडी पोलीस ठाण्यात तैनात आहे. ठाण्यातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशहर पोलिसातील शिपाई आहे मृताचा काकाअधिकारीसह सात पोलीस क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फुटबॉल खेळाडूच्या मृत्यूने शहर पोलिसातही कोरोना विषाणूच्या संसर्गाची चाहूल दिसून येत आहे. मृत युवकाचा काका हा बेलतरोडी पोलीस ठाण्यात तैनात आहे. ठाण्यातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.मृताचा काका बेलतरोडी ठाण्यात नायक शिपाई आहे. त्याने युवकाला रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली होती. यामुळे त्याला आणि कुटुंबाला कोरोना संसर्ग झाल्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काकाशी संबंधित बेलतरोडी ठाण्यातील एक अधिकारी आणि सहा कर्मचाऱ्यांनासुद्धा तात्काळ एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. ठाणेदार विजय आकोत यांनी डॉक्टरांच्या पथकाला बेलतरोडी ठाण्यात बोलावले. ठाणे परिसराला सॅनिटाईझ करून सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला. बेलतरोडी ठाण्यात ७ अधिकारी आणि ८८ कर्मचारी आहेत. पोलीस आपला जीव धोक्यात घालून कोरोना योद्धाची भूमिका निभावत आहे. या घटनेने त्यांचे कुटुंबीय प्रचंड चिंतित आहेत.मृत युवक फुटबॉल खेळाडूसोबतच तो ‘स्किझोफ्रेनिया’ने ग्रस्त होता. हा एकप्रकारचा मानसिक आजार आहे. त्याच्यावर उपचारही सुरू होते. वडील तुरुंगात असल्याने आई लोकांच्या घरी भोजन बनवण्याचे काम करते. ती नेहमी कामात व्यस्त राहते. बेरोजगार असल्याने युवकही दिवसभर परिसरात फिरत राहत होता. यामुळे मागील काही दिवसात तो अनेकांच्या संपर्कातही आला. पार्वतीनगर दाट लोकवस्तीचा परिसर आहे. युवक व त्याच्या कुटुंबीयांशी संबधित वस्ती ‘डेंजर झोन’मध्ये आली आहे. पोलीस आणि प्रशासन युवक व त्याच्या आईच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करीत आहे.युवक हा अजनी पोलीस ठाणे परिसरातच फिरत राहायचा. त्यामुळे त्याला परिसरातील व्यक्तीकडूनच संसर्ग झाल्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या वस्तीतील काही लोकांचे मध्य आणि पूर्व नागपूरशी संपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोना झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु त्या लोकांचा खुलासा न झाल्याने पार्वतीनगरात कोरोनाची पुष्टी होऊ शकलेली नाही. काही नावे समोर आली असून, त्याची चौकशी करून खरा प्रकार जाणून घेण्यात येत आहे.पोलीस विभागाने घेतली गंभीर दखल - पोलीस आयुक्तपोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले की, कोरोनापासून वाचवण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व केले जात आहे. सध्याच्या घटनेला अतिशय गांभीर्याने घेण्यात आले आहे. मृताच्या काकाशी थेट संबंधित लोकांना क्वारंटाईन करून इतरांवर लक्ष ठेवले जात आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी पोलिसांना मास्क, हॅण्ड सॅनिटायजर, फिजिकल डिस्टन्सिंगसह सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्याचेही प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेसह भोजन आणि इतर आवश्यक वस्तू पोहोचवण्याची सामाजिक जबाबदारीसुद्धा आहे. यावर खरे उतरण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याNagpur Policeनागपूर पोलीस