शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे ५५ टक्क्याने रुग्णसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:21 IST

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात होताच संसर्गाचा भीतीने मेडिकलमधील‘ओपीडी’तील रुग्णांची गर्दी अचानक कमी झाली. मार्च २०१९ मध्ये ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात होताच संसर्गाचा भीतीने मेडिकलमधील‘ओपीडी’तील रुग्णांची गर्दी अचानक कमी झाली. मार्च २०१९ मध्ये ८० हजार रुग्णांची असलेली ओपीडी मार्च २०२०मध्ये ५९ हजारांवर आली. कोरोनाचा जसजसा वेग वाढत गेला तसतशी रुग्णांची संख्या आणखी कमी होत गेली. एकूणच २०१९च्या तुलनेत २०२० मध्ये ५५.८४ टक्क्याने रुग्णसंख्येत घट आली. मात्र आता कोरोनाबाधितांची संख्या कमी होताच पुन्हा नॉनकोविडची रुग्णसेवा पूर्वदावर येऊ पाहत आहे. दररोज २ हजारावर रुग्णांची वैद्यकीय तपासणी होत आहे.

‘लॉकडाऊन’च्या काळात रहदारीची साधने बंद होती. अत्यावश्यक सेवेमध्ये रुग्णसेवेचा समावेश असला तरी कोरोनाचा दहशतीमुळे शासकीय रुग्णालयातून उपचार घेणे अनेकांनी टाळले. या काळात रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या गर्दीमध्ये लक्षणीय कमी दिसून आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) २०१९ मध्ये एकूण ९४७०९७ रुग्णांनी उपचार घेतले असता २०२० मध्ये यात घट होऊन ही रुग्णसंख्या ५२८९४९ वर आली. रोज ३ हजारांवर जाणारी ओपीडी १ हजार व त्यापेक्षा खाली आली. या काळात काही रुग्णांनी घरगुती उपचारावर तर काहींनी डॉक्टरांशी टेलिफोनिक संपर्क साधून उपचार घेतले. परंतु ऑक्टोबर २०२० पासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागताच इतर रुग्णांची संख्या वाढू लागली. विशेष म्हणजे, डिसेंबर २०२० मध्ये रुग्णांची संख्या ५४ हजारांवर गेली.

-त्वचारोग विभागात रुग्णांची गर्दी कायम

मागील वर्षी मेडिकलच्या सर्वच विभागात ३० ते ५० टक्क्याने रुग्णांत घट आली असताना त्वचा रोग विभागात मात्र, रुग्णांची गर्दी कायम होती. २०१९ मध्ये १३४००१ रुग्णांनी तर २०२०मध्ये ८५१७८ रुग्णांनी उपचार घेतले. कोरोनाचा फटका मेडिकलचा आकस्मिक विभाग म्हणजे ‘कॅज्युअल्टी’लाही बसला. २०१९ मध्ये येथे ९१९०५ रुग्णांची नोंद झाली असताना २०२०मध्ये ही संख्या २०७५२ वर आली.

-५० टक्क्याने शस्त्रक्रियाही झाल्यात कमी

कोविडचा फटका शस्त्रक्रियांनाही बसला. २०१९ मध्ये ७१४७३ जनरल सर्जरी झाल्या असताना २०२० मध्ये ३५७६६ शस्त्रक्रिया होऊ शकल्या. एकूण ५० टक्क्याने शस्त्रक्रिया कमी झाल्या. मात्र मागील डिसेंबर महिन्यात शस्त्रक्रियांची संख्या वाढली आहे. महिन्याभरात ३५२१ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

-

२०१९ २०२०

जानेवारी ७६५७३ ७७३३७

फेब्रुवारी ७८४५१ ७६११४

मार्च ८०१९५ ५९५०८

एप्रिल ७०४४७ २१७६९

मे ७२२८९ २६२७१

जून ७८३५० ३६८१९

जुलै ८३०५६ ४५४९३

आॅगस्ट ८०४९३ ३४०६२

सप्टेंबर ८०९६० ३३०५०

ऑक्टोबर ७८४४९ ३४२५७

नोव्हेंबर ८६७७३ ३६७१९

डिसेंबर ८१०६१ ४७५५०