शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा भडका; १३२ बंदिवान पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 21:26 IST

मध्यवर्ती कारागृहात १३२ बंदिवान पॉझिटिव्ह आले, तर इतर ठिकाणाहून १२ रुग्णांचे निदान झाल्याने १४४ रुग्णांची नोंद झाली.

ठळक मुद्दे१४४ रुग्णांची नोंद आणखी दोघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रॅपिड अ‍ॅण्टीजेन चाचणीमुळे १५ ते ३० मिनिटात अहवाल येऊ लागल्याने चाचण्यांची गती वाढली आहे तर दुसरीकडे रुग्णांची संख्याही वाढली आहे. मध्यवर्ती कारागृहात ही चाचणी केली असता १३२ बंदिवान पॉझिटिव्ह आले, तर इतर ठिकाणाहून १२ रुग्णांचे निदान झाल्याने १४४ रुग्णांची नोंद झाली. कोरोना प्रादुर्भावातील या चार महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. रुग्णांची एकूण संख्या २०७१ वर पोहचली आहे. यात दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३२ झाली आहे. रॅपिड अ‍ॅण्टीजेन चाचणीला ‘इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) मंजुरी दिली आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यात १५ हजार किट उपलब्ध झाल्या आहेत. या किटच्या मदतीने सध्यातरी शहरात बंदिवानांची चाचणी केली जात आहे, त्यानुसार १३२ बंदिवान पॉझिटिव्ह आले. कारागृहात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७९ झाले आहे. विशेष म्हणजे, लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची मेयो, मेडिकलमध्ये तपासणी करून त्यांना कारागृहातील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे.मेयोच्या एका निवासी डॉक्टरसह १२ पॉझिटिव्ह आले.मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टर पॉझिटिव्ह येण्याची ही पहिलीच वेळ आहे. खबरदारी म्हणून डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी अशा २५ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या शिवाय, ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात कामठी मिल्ट्री हॉस्पिटलमधील एक, जुनी मंगळवारी येथील एक, बगडगंज येथील एक, हनुमाननगर झोनमधील एक, खदान येथील एक तर कुंभारटोली येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. आज २८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यात मेयोतून १४, एम्समधून १० तर मेडिकलमधून चार रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४२८ झाली आहे.दुसऱ्या दिवशीही मृत्यूसत्र सुरूचबुधवारी तीन रुग्णांचा मृत्यूनंतर गुरुवारी पुन्हा दोन रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली. हे दोन्ही रुग्ण नागपूर बाहेरील आहे. यातील एक कोंढाळी येथील रहिवासी ७८ वर्षीय पुरुष आहे. या रुग्णाला ७ जून रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. श्वास घेणे कठीण झाल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरा मृत रुग्ण हा अमरावती येथील होता. ६६ वर्षीय या पुरुष रुग्णाला २ जून रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. रुग्णाला पक्षाघातासोबतच इतरही आजार होते. उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला.१५०० हजार किट्स उपलब्धजास्तीत जास्त रुग्णांची तपासणी होऊन त्यांचा अहवाल तातडीने उपलब्ध होण्याच्या उद्देशाने ‘रॅपिड अ‍ॅण्टीजेन चाचणी’ सुरू करण्यात आली आहे. यासाठी राज्यशासनाकडून ५ हजार तर विभागीय आयुक्त कार्यालयाने १० हजार अशा १५ हजार किट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. इतर जिल्ह्यांनाही ५ हजार किट्स घेण्याचा सूचना दिल्या आहेत. गरज पडल्यास संस्थात्मक विलगीकरण कक्षाला कोविड केअर सेंटर तयार करण्यात येईल.डॉ. संजीव कुमार विभागीय आयुक्त, नागपूर

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस