शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

कोअर कमिटीवरून सत्ताधारी ‘बॅकफूट’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:33 IST

सत्तापक्षाच्या नगरसेवकांच्या फाईल मंजुरीसाठी कोअर कमिटीच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेतला जाणार होता.

ठळक मुद्देविरोधकांचा दबाव : नियोजित बैठकच रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्तापक्षाच्या नगरसेवकांच्या फाईल मंजुरीसाठी कोअर कमिटीच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेतला जाणार होता. परंतु कोअर कमिटीच्या बैठकीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आक्षेप नोंदविल्याने महापालिकेतील सत्तापक्षाला ‘बॅकफूट’वर यावे लागले. सोमवारी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली. परंतु यावर पदाधिकाºयांनी चुप्पी साधली आहे.अघोषित आर्थिक आणीबाणीमुळे नगरसेवक त्रस्त आहेत. प्रभागातील तातडीच्या विकास कामांच्या फाईल मंजूर असूनही प्रशासकीय कार्यादेश मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे सत्तापक्षाच्या नगरसेवकांत निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली गठित कोअर कमिटीची सोमवारी बैठक होणार होती. परंतु या कमिटीला होत असलेला विरोध विचारात घेता बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रभागातील विकास कामांच्या फाईल मंजूर व्हाव्यात यासाठी नगरसेवकांनी तगादा लावला आहे. सदस्यांची नाराजी दूर करण्यासाठी निधी वाटपाचे नवीन धोरण कोअर कमिटीच्या बैठकीत निश्चित करण्यात येणार होते. गेल्या शुक्रवारीच ही बैठक होणार होती. परंतु काही कारणांनी ती सोमवारी घेण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र या बैठकीला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विरोध दर्शविल्याने सोमवारी बैठकच झाली नाही.महापौर म्हणतात, अशी कमिटीच नाहीशुक्रवारी रद्द झालेली कोअर कमिटीची बैठक सोमवारी होणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली होती. परंतु सोमवारी या संदर्भात त्यांना विचारणा केली असता अशी कोणतीही कोअर कमिटी नाही, असे सांगून त्यांनी या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमवारी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांचे या बैठकीकडे लक्ष लागून होते.तीन लाखावरील फ ाईल थांबविल्यापावसाळ्याच्या दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, नाल्या व सिवेज लाईनची दुरुस्ती, फ्लोरिंग अशा तातडीच्या कामासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. त्यानुसार नगरसेवकांनी झोन स्तरावरून फाईल मंजुरीसाठी पाठविलेल्या आहेत. स्थायी समिती अध्यक्षांचे शिफारसपत्रही याला जोडले आहे. परंतु प्रशासनाने तीन लाखांहून अधिक रकमेच्या फाईल थांबविल्या आहेत. यामुळे नगरसेवकांची आर्थिक कोंडी झाली आहे.महापौर, आयुक्तांना वनवे यांनी दिले पत्रअसंवैधानिक कोअर कमिटीमुळे स्यायी समितीच्या घटनात्मक अधिकारावर गदा येईल. त्यामुळे चुकीचा प्रथा सुरू होईल. तसेच कोअर कमिटीत सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षाच्या सदस्यांचाही समावेश करण्यात यावा. यासंदर्भात विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सोमवारी महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांना पत्र दिले. यामुळे कोअर कमिटीचे भवितव्य संकटात आले आहे.