शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोराना विषाणूचा घरातील कर्त्या पुरुषावरच घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 20:26 IST

Corana virus attack, Nagpur News कोरोनाची सर्वाधिक लागण ३० ते ५० वयोगटामध्ये झाली आहे. नागपूर जिल्ह्यात गुरुवारी नोंद झालेल्या ८६३८१ रुग्णांपैकी या वयोगटातील ३४३८२ रुग्णांचा समावेश आहे.

ठळक मुद्देधक्कादायक, ५० वरील वयोगटात ७६.१२ टक्के मृत्यू : ३१ ते ५० वयोगट सर्वाधिक बाधित

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाची सर्वाधिक लागण ३० ते ५० वयोगटामध्ये झाली आहे. नागपूर जिल्ह्यात गुरुवारी नोंद झालेल्या ८६३८१ रुग्णांपैकी या वयोगटातील ३४३८२ रुग्णांचा समावेश आहे. याचे प्रमाण ३९.८० टक्के आहे. तर ५० व त्यापुढील वयोगटात १८६२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याची टक्केवारी ७६.१२ टक्के आहे. कोरोना विषाणू घरातील कर्त्या पुरुषावरच घाला घालीत असल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे.जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरूवात झाली. ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येने वेग धरला. सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित व मृत्यूच्या संख्यची विक्रमी नोंद झाली. परंतु ऑक्टोबर महिन्याच्या या आठ दिवसांत कोरोनाचा जोर कमी होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु गाफील राहू नका, पुढे हिवाळा आहे. थंडीच्या दिवसात विषाणू अधिक काळापर्यंत जिवंत राहत असल्याने अधिक काळजी घेणे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक आहे. उपलब्ध माहितीनुसार, ० ते १५ वयोगटात ५६९२ रुग्ण (६.५० टक्के), १६ ते ३० वयोगटात २१६०३ (२५.०१ टक्के), ५० वर्षांवरील वयोगटात २४४०३ (२८.२५ टक्क) रुग्णांची नोंद झाली आहे. ३०१ बाधितांच्या वयोगटाची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.० ते १५ वयोगटात ७ मृत्यूनागपूर जिल्ह्यात बाधितांच्या मृतांची संख्या २४४६ वर पोहचली आहे. यात पाच दिवसांच्या चिमुकल्यांपासून ते १०२ वर्षांच्या वृद्धेच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ० ते ७ वयोगटात ७, १६ ते ३० वयोगटात ७१, ३१ ते ५० वयोगटात ५०६, बाधितांचा मृत्यू झाला आहे. ५० वर्षांवरील वयोगटातील सर्वाधिक मृत्यूला अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग तसेच फुफ्फुसांचे आजार कारणीभूत ठरला आहे.गाफील राहू नकाशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोनाबाधितांसोबतच मृत्यूची संख्या कमी होऊ लागली आहे. परंतु गाफील राहू नका. कोरोनाचे संकट टळलेले नाही. प्रत्येकाने घराबाहेर पडताना नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. यात मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, चेहऱ्याला हात न लावणे व वारंवार हात धूत राहणे किंवा सॅनिटाईझ करणे गरजेचे आहे.डॉ. संजय जयस्वालउपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर