शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील छोट्याशा भिसी गावच्या गजानन लडी यांनी मिळविले चक्रासन रेसचे कॉपीराईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 18:21 IST

चक्रासन हे योगासनातील उत्कृष्ट आसन आहे. योगातील याच आसनामध्ये व्यक्ती चालू शकतो. गजानन लडी यांनी या आसनाद्वारे विविध विक्रम केले आहेत. हे आसन जगभरात पोहोचविण्यासाठी चक्रासन रेसचे आयोजन करून त्याचे कॉपीराईट मिळविले आहे, सोबतच देशाला एक नवीन खेळ दिला आहे.

ठळक मुद्देचक्रासनात केले विविध विक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चक्रासन हे योगासनातील उत्कृष्ट आसन आहे. योगातील याच आसनामध्ये व्यक्ती चालू शकतो. गजानन लडी यांनी या आसनाद्वारे विविध विक्रम केले आहेत. हे आसन जगभरात पोहोचविण्यासाठी चक्रासन रेसचे आयोजन करून त्याचे कॉपीराईट मिळविले आहे, सोबतच देशाला एक नवीन खेळ दिला आहे.गजानन लडी हे चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी या छोट्याशा गावातून नोकरीसाठी १९९९ मध्ये नागपुरात आले. त्रिमूर्तिनगरात किरायाने राहत होते. चक्रासनाची आवड असल्याने,जवळच असलेल्या राजीव गांधी उद्यानामध्ये सराव करायचे. या सरावातून त्यांनी चक्रासनावर चालण्याची कसब मिळविले. ते उद्यानात उलटे चालत असल्याने अनेकांना त्यांचे कुतुहल वाटायचे. काही जण हसायचेही. पण गजानन यांनी त्यांच्याकडे लक्ष न देता, चक्रासनातून समाजाला काही तरी देण्याची मनीषा बाळगली. त्यासाठी सुरुवातीला चक्रासनाद्वारे विक्रम करण्याचा निर्णय घेतला. २००३ मध्ये त्यांनी तेलंगखेडी हनुमान मंदिराच्या ६० पायऱ्या ३ मिनिटात चक्रासनाद्वारे चढल्या. याच वर्षी २२१५ किलो वजनाची टाटा सुमो गाडी १ मिनिटात १०० मीटर चक्रासनाद्वारे ओढत नेली. सोमलवार हायस्कूलच्या ७२ पायºया ९० सेकंदात चढल्या. गायत्रीनगर पाण्याच्या टाकीच्या गोलाकार १३० पायºया ४ मिनिटात चढल्या. गणेश टेकडीचा २६० फुटाचा चढाव २ मिनिटात पूर्ण केला तर ३ डिसेंबर २००५ मध्ये लोकमतच्या ३०० पायºया ८ मिनिटात चक्रासनाद्वारे चढल्या. ते शाब्बास इंडिया शोमध्ये विनर ठरले होते. त्यांना २०१३ मध्ये इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले तर २०१४ मध्ये युनिक वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले.चक्रासनाला त्यांनी स्वत:पुरते मर्यादित न ठेवता, येणाºया भावी पिढीला लाभ मिळावा यासाठी २०१२ पासून चक्रासन रेससाठी प्रयत्न सुरू केले. २०१२ मध्ये चक्रासन स्पोर्टस् असोसिएशनची स्थापना करून, त्याद्वारे पहिली चक्रासन रेस स्पर्धा आयोजित केली. पुढे ही स्पर्धा त्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविली. २०१७ मध्ये चक्रासन रेसची पहिली नॅशनल स्पर्धा नागपुरात झाली. यात बिहार येथून स्पर्धक सहभागी झाले होते. चक्रासन रेस ही जगातील वैविध्यपूर्ण रेस असून, त्याचे कॉपीराईट केंद्र सरकारकडून त्यांनी मिळविले आहे. शालेय खेळामध्ये समावेश करावाचक्रासन रेसची व्याप्ती वाढावी म्हणून गजानन शाळांमध्ये विद्यार्थ्यांना धडे देतात. ग्रामीण भागातून विद्यार्थी तयार करतात. स्पर्धेचे आयोजन करतात. ही रेस राज्य शासनाने शालेय खेळात समाविष्ट करावी म्हणून त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या रेसचा आॅलिम्पिक खेळामध्ये समावेश करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. चक्रासनाचे फायदेचक्रासन हे योगासनातील कठीण आसन असले तरी, नियमित सरावात सहज करता येते. याचे फायदेही आयुष्यभर होतात. चक्रासनाद्वारे लवचिकता येते. डोळ्यांचे आजार होत नाही. कंबरेचा त्रास होत नाही. स्नायू बळकट होतात. पोटाची चरबी कमी होते, उंची वाढते, शारीरिक-मानसिक आणि बौद्धिक विकासात भर पडते, असे गजानन लडी यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Yogaयोगnagpurनागपूर