शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोड बोलण्यापेक्षा सहकार्यातून विकास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 08:00 IST

गुड बोला.. गोड बोला या लोकमतच्या प्रभावी उपक्रमात गोड बोलण्याला स्पष्टतेची किनार असण्याविषयी सांगत आहेत, नासुप्र सभापती व महानगर आयुक्त शीतल उगले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:आपल्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा असावाच. नियमानुसार काम होत नसेल तर स्पष्ट सांगणे गरजचे आहे. परंतु त्यामुळे समोरची व्यक्ती नाराज होत असेल तर तिच्या चांगल्यासाठीच आपण ते सांगत आहोत. अशी भूमिका मांडल्यास समारेच्याचाही गैरसमज होणार नाही. हेही तितकेच महत्त्वाचे.वस्थापनात लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक व कर्मचारी यांच्याशी नुसते गोड बोलून समस्या सुटणार नाही. कामातही गोडी असली पाहिजे. संस्थेशी संबंधित सर्वांच्या सहकार्याने व समन्वयातून विकास व जनतेची कामे व्हावीत, असे मला वाटते.नागपूर सुधार प्रन्यास, महानगर नियोजन प्राधिकरण संदर्भात अनेकजण कामे घेऊ न येतात. काही लोकांच्या तक्रारीही असतात. येणाऱ्या व्यक्तीशी नुसते गोड बोलून त्यांचे समाधान होणार नाही, समस्याही सुटणार नाही. त्याची नेमकी समस्या जाणून ती सोडविणे महत्त्वाचे आहे. समोरच्या व्यक्तीची समस्या सोडण्यात कायदेशीर अडचणी असल्यास आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचा सल्ला त्याला देणे महत्त्वाचे वाटते. गोड बोलण्यापेक्षा हे अधिक महत्त्वाचे आहे.आयुक्त व सभापती असल्याने दररोज अनेक नागरिक समस्या घेऊ न येतात. सर्वांसोबत आपण चांगले बोलतो. अशावेळी येणाऱ्यांशी नुसते गोड बोलून भागणार नाही. संबंधित व्यक्तीची समस्या मार्गी लागण्यासाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याची गरज असते. यासाठी समन्वय महत्त्वाचा असतो. सोबतच लोकप्रतिनिधी व नागरिकांशी सुसंवाद तितकाच महत्त्वाचा आहे. यातून अनेक प्रश्न मार्गी लागण्याला मदत होते. समस्या घेऊन येणाऱ्याशी नुसते गोड बोलून परत केले तर त्याची बोळवण होईल. त्याची समस्या कशी सुटेल यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो. यात अधिकारी व सहकाऱ्यांची सकारात्मक भूमिका तितकीच महत्त्वाची असते.शासकीय कार्यालयात येणाऱ्यांचे काम व्हावे अशी अपेक्षा असते. त्याची अकारण अडवणूक न करता त्याचे काम तातडीने मार्गी लागले तर संबंधितांचे समाधान होते. काम न करता नुसते गोड बोलणे योग्य नाही. अशा गोड बोलण्याला काहीही अर्थ उरणार नाही. त्याची जी काही समस्या असेल ती सोडविली जावी. यासाठी त्याला योग्य सल्ला देणे, समजावून सांगणे आवश्यक आहे.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती