शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकरांचा कुल संडे; @7.5

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:02 IST

नागपुरातील रविवारची तापमानाची नोंद ७.६ अंश सेल्सिअस एवढी झाली.

ठळक मुद्देगार वाऱ्यामुळे दिवसभर हुडहुडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकरांचा हा रविवार ‘कुल संडे’ ठरला. दिवसभर वाहणारे बोचरे वारे व त्यामुळे भरलेल्या हुडहुडीने नागपूरकर दिवसभर चांगलेच गारठले होते. नागपूरसह ब्रह्मपुरी आणि गोंदियातही तापमानाचा पारा नागपूरएवढाच खालावलेला होता.नागपुरातील रविवारची तापमानाची नोंद ७.६ अंश सेल्सिअस एवढी झाली. सुटीचा दिवस असल्याने नागपूरकर एन्जॉयच्या मूडमध्ये असले तरी बोचऱ्या थंडीमुळे अनेकांनी बाहेर जाण्याचे टाळले. त्यामुळे एरवी रविवारी दिसणारी गर्दी कमी जाणवली. बर्डीवरील रविवारच्या बाजारावरही या गर्दीचा परिणाम जाणवला. सायंकाळी लवकरच येथील गर्दी कमी झालेली जाणवली.विदर्भात गोंदियाचे तापमान सर्वात कमी म्हणजे ७.५ अंश सेल्सिअसखाली उतरले होते. नागपूरएवढेच ७.६ अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरीमध्येही नोंदविले गेले. गडचिरोलीचे तापमान ९.२ होते, तर वर्धामध्ये १० अंश, चंद्रपुरात १०.४ अंश, अमरावतीमध्ये ११.४ अंश आणि अकोल्यात ११.७ अंश सेल्सिअस अशी दिवसभराच्या तापमानाची नोंद करण्यात आली.बुलडाणाचे तापमान विदर्भात सर्वाधिक १२.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्या खालोखाल यवतमाळात १२.४ आणि वाशिममध्ये १२ ७.६ अंश सेल्सिअस नोंद झाली.वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात पावसाची शक्यता नाही.

कडाक्याच्या थंडीने घेतला एकाचा बळीकडाक्याच्या थंडीत उघड्यावर राहणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीचा (वय अंदाजे ३५ ते ४०) गारठून मृत्यू झाला. रविवारी सकाळी तो निपचित पडलेला सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या परिसरात आढळला. त्याला मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सीतबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :weatherहवामान