शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील हॉटेलमधील कूकच्या हत्याकांडाचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 21:20 IST

सीताबर्डीतील हॉटेल खालसाच्या कूकची हत्या त्याचे तीन लाख रुपये लुटण्यासाठी झाली. मृताच्या सोबत काम करणाऱ्या तीन आरोपींनीच ही हत्या केल्याचे उघड झाले असून, यातील मुख्य सूत्रधाराला सीताबर्डी पोलिसांनी मध्य प्रदेशमधून अटक करून नागपुरात आणले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीताबर्डीतील हॉटेल खालसाच्या कूकची हत्या त्याचे तीन लाख रुपये लुटण्यासाठी झाली. मृताच्या सोबत काम करणाऱ्या तीन आरोपींनीच ही हत्या केल्याचे उघड झाले असून, यातील मुख्य सूत्रधाराला सीताबर्डी पोलिसांनी मध्य प्रदेशमधून अटक करून नागपुरात आणले. सतीश ऊर्फ बबलू रामराईस तिवारी (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो हनुमाना तालुक्यातील (जिल्हा रीवा, मध्य प्रदेश) रहिवासी आहे. लोकमत चौकाजवळ फिर्यादी जसपालसिंग गुरमितसिंग बादल (वय ४८) यांचे हॉटेल खालसा आहे. लॉक डाऊनमुळे हॉटेल बंद असले तरी हॉटेलमध्ये कूक असलेला शंकर आणि अन्य तीन कर्मचारी हॉटेलमध्येच राहत होते. शंकर हा अनाथ होता. तो रात्रंदिवस हॉटेलमध्येच काम करायचा आणि तेथेच राहायचा. त्याने आपल्या पगारातून तीन लाख रुपयांची रक्कम जमा केली होती. ही रक्कम तो जवळच ठेवायचा. लॉकडाऊनमुळे सोबत राहत असल्याने आरोपींना या रकमेचा सुगावा लागला. त्यांनी ती रक्कम लांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र शंकरने आरोपी तिवारी आणि अन्य दोघांचा तीव्र प्रतिकार केला. त्यामुळे आरोपीने त्याच्या डोक्यावर लोखंडी खलबत्त्याचा वार करून त्याला जखमी केले. नंतर त्याचे हात-पाय आणि तोंड नारळाच्या दोरीने बांधले. तोंडाला सेलोटेप चिटकवली आणि ब्लँकेटमध्ये गुंडाळून हॉटेलमधून आरोपी पळून गेले. शंकर याच्या मृतदेहाची दुर्गंधी सुटल्यामुळे ती घटना १४ मे रोजी उघडकीस आली. पोलिसांनी मृतदेह मेडिकलला पाठविल्यानंतर हॉटेल मालक जसपालसिंग बादल यांच्याकडून हॉटेलमध्ये काम करणाºया आरोपींची नावे माहीत करून घेतली. त्यातील मुख्य आरोपी सतीश ऊर्फ बबलू तिवारी याने एक नवीन मोबाईल घेऊन त्याच्यात जुने सिम कार्ड टाकून वापरणे सुरू केले होते. तो धागा पकडून पोलिसांनी आरोपी तिवारीला मध्य प्रदेशच्या सीमेवरील बशीगडा गावात जाऊन अटक केली. त्याच्याकडून शंकरकडून लूटलेल्या तीन लाखांपैकी ५२ हजार रुपयांची रक्कम तसेच एक मोबाईल जप्त केला.अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त विनिता साहू, सहायक आयुक्त विलास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डीचे ठाणेदार जगवेंद्रसिंग राजपूत, निरीक्षक विकास दिंडोरी यांच्या नेतृत्वात एपीआय किशोर शेरकी, पीएसआय प्रवीण सूरकर, हवालदार शंकर कोडापे, अजय काळे, नायक विशाल अंकलवार, ओमप्रकाश भारतीय, संदीप भोकरे, प्रीतम यादव, युवराज मते, प्रफुल्ल मानकर, गणेश जोगळेकर, पंकज निकम आणि विक्रम ठाकूर यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :MurderखूनhotelहॉटेलArrestअटक