शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान

By योगेश पांडे | Updated: June 5, 2025 22:07 IST

युद्धपरिस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची समंजस भूमिका लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सरकार व सैन्याने आवश्यक ती कारवाई केली. या प्रसंगाने सैन्याची क्षमता व वीरता जगासमोर आली

योगेश पांडेनागपूर : आदिवासी भागांमध्ये धर्मांतरणाचा मुद्दा गंभीर आहे. संस्कृतीचे मूळ आदिवासी समाजातच असून त्यांनी देशाची परंपरा जपली आहे. मनापासून जर कुणी पुजेची पद्धती बदलत असेल तर त्याला कुणीच आक्षेप घेण्याचा प्रश्न नाही. मात्र विविध आमिषे दाखवून व जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच आहे. धर्मांतरण ही हिंसाच आहे. जर अशा पद्धतीने धर्मांतरण झालेला व्यक्ती घरवापसी करत असेल तर त्याचा स्वीकार करायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयच्या समारोपप्रसंगी गुरुवारी ते बोलत होते.

रेशीमबाग मैदानावर झालेल्या कार्यक्रमाला कॉंग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री अरविंद नेताम, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक राजेश लोया, वर्गाचे सर्वाधिकारी समीरकुमार महांती प्रामुख्याने उपस्थित होते. आदिवासी हे आपल्या समाजाचाच हिस्सा आहे. धर्मांतरण व इतर समस्यांसंदर्भात आदिवासी समाजाला सोबत घेऊन आम्ही शक्य ते सहकार्य करू. शासन, प्रशासन सहाय्यक असू शकतात, मात्र संबंधित लोकांनीदेखील कामात सहभागी झाले पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.

सैन्याची क्षमता व सरकारच्या दृढतेचे दर्शनपहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सरकार व सैन्याने आवश्यक ती कारवाई केली. या प्रसंगाने सैन्याची क्षमता व वीरता जगासमोर आली. संरक्षणविषयक विविध संशोधन किती आवश्यक व कामाचे आहेत हे सिद्ध झाले. तसेच केंद्र शासनाची दृढता दिसून आली. महत्त्वाचे म्हणजे सर्व पक्षांच्या नेत्यांनी समजूतदारपणा व परस्पर सहयोगदेखील जगाने पाहिला. संपूर्ण समाजाने आपल्या एकतेचे उदाहरण प्रस्तुत केले. जर अशी भावना चिरंतर राहिली तर सुदृढ लोकशाहीचे दृष्य यातून समोर येईल,असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.

संरक्षणासंदर्भात आत्मनिर्भरतेवरच भर हवापहलगाम हल्ल्यानंतर आपण कारवाई केली म्हणजे समस्या दूर झाली असे नाही. युद्धाचे प्रकार बदलले आहेत. दहशतवादाला खतपाणी घालत त्यामाध्यमातून लढण्यात येत आहे. सायबर वॉरपासून अगदी प्रॉक्सीवॉर सातत्याने सुरू आहे. आता घरी बसून एका क्लिकवर ड्रोन नियंत्रित करून युद्ध केले जाऊ शकते. त्यामुळे आपल्या सुरक्षेच्या बाबतीत आपल्याला आत्मनिर्भर व्हावेच लागेल. यासाठी सेना, शासन, प्रशासनासोबतच समाजानेदेखील एकत्रित यायला हवे,असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

सरसंघचालकांचे इतर प्रमुख मुद्दे- देशहितासमोर इतर सर्व स्वार्थ गौण असले पाहिजेत- एकमेकांसोबत सद्भावना कायम असली पाहिजे- भावनावेगात वाहून जाऊन वाट्टेल तसे वागणे व त्याच्या प्रतिक्रियेत कायदा हातात घेऊन मनमानी करणे योग्य नाही.- समाजात हिंसा करणे, विनाकारण शिवीगाळ करणे, प्रतिक्रिया देताना काहीही बोलणे हे आपल्याला सोडावे लागेल.- समाज तोडणारे भाषण करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू नका

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ