शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणीची सोय; पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:55 IST

तुरीच्या खरेदीसाठी यावर्षापासून शेतकऱ्यांच्या आॅनलाईन नोंदी करण्यात येत आहे, अशी माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

ठळक मुद्देजालन्यातील नाफेड केंद्रावरील गैरप्रकाराबाबत प्रश्न

आॅनलाईन लोकमतनागपूर : तुरीच्या खरेदीसाठी यावर्षापासून शेतकऱ्यांच्या आॅनलाईन नोंदी करण्यात येत आहे, अशी माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.सदस्य डॉ. मिलिंद माने यांनी जालना जिल्ह्यातील नाफेड केंद्रावर तूर विक्रीमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले की, या संदर्भात चंदनझिरा ता. जालना येथील पोलीस ठाण्यात ४९ शेतकरी, १९ व्यापारी व अन्य दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी झालेल्या चर्चेच्या उपप्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री खोत म्हणाले की, यावर्षी तुरीच्या खरेदीसाठी नाफेडमार्फत केंद्र सुरू केले जाणार आहे. त्याचबरोबर खरेदी केंद्रांवर शेतकरी बांधवांना आॅनलाईन नोंदणीदेखील करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुरीमध्ये आर्द्रता बाराच्यावर आल्यास त्यात सवलत देण्याबाबत केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य वीरेंद्र जगताप, अनिल कदम यांनी भाग घेतला.चौकशी करून निर्दोष शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणारया प्रश्नावरील चर्चेत काही निर्दोष शेतकऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हा यासंबंधात चौकशी केली जाईल, त्यात शेतकरी निर्दोष आढळून आल्यास त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जातील, असेही राज्यमंत्री खोत यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Sadabhau Khotसदाभाउ खोत