शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्यावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 20:34 IST

शेगाव येथील संत गजानन महाराज देवस्थानकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बाजूला करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. नगर परिषदेने हा पुतळा हटविण्याची गरज नसल्याचा प्रस्ताव पारित केला आहे तर, निरीक्षण समितीने पुतळा हटविणे गरजेचे असल्याचे मत दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित शेगाव विकासाच्या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान मंगळवारी या विषयावर युक्तिवाद झाला.

ठळक मुद्देशेगाव विकासाचे प्रकरण : हायकोर्टाने मागितली सत्य माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेगाव येथील संत गजानन महाराज देवस्थानकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बाजूला करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. नगर परिषदेने हा पुतळा हटविण्याची गरज नसल्याचा प्रस्ताव पारित केला आहे तर, निरीक्षण समितीने पुतळा हटविणे गरजेचे असल्याचे मत दिले आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित शेगाव विकासाच्या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान मंगळवारी या विषयावर युक्तिवाद झाला. नगर परिषदेच्या प्रस्तावाकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. बाबासाहेबांचा पुतळा ४० वर्षांपासून रोडवर असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही. तसेच, या ठिकाणी आतापर्यंत एकदाही अपघात झाला नाही असे न्यायालयाला सांगण्यात आले. निरीक्षण समितीच्या अहवालाची माहितीही न्यायालयाला देण्यात आली. पुतळ्यामुळे वाहनांना यू-टर्न घेणे कठीण जाते. त्यामुळे पुतळा रोडच्या बाजूला करणे आवश्यक आहे ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. हा वाद लक्षात घेता न्यायालयाने सत्य परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय यासंदर्भात सध्यास काहीही आदेश देण्यास नकार दिला व नगर परिषदेने सांगितलेली माहिती सत्य आहे याचे प्रतिज्ञापत्र अध्यक्षांनी सादर करावे असे निर्देश दिलेत.याशिवाय अन्य मुद्यांवरही न्यायालयात सुनावणी झाली. त्यातील चारमोरी येथील अंडर पासेसचे ३१ जानेवारीपर्यंत व रेल्वेस्थानकावरील होम प्लॅटफॉर्मचे १५ फेब्रुवारीपर्यंत लोकार्पण करण्यात येईल अशी ग्वाही मध्य रेल्वेने न्यायालयाला दिली. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पुढील सुनावणी ६ फेब्रुवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे. याप्रकरणात अ‍ॅड. फिरदोस मिर्झा न्यायालय मित्र आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर