शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावरील कुत्र्यांचा केला बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:58 IST

नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरात मंगळवारी मोकाट कुत्र्यांना जाळी लावून पकडण्यात आले. रेल्वे प्रशासनाने महापालिकेच्या कांजी हाऊस विभागाच्या सहकार्याने हे अभियान राबविले. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी ‘कुत्रे गुरगुरतात, लाईटही बंद असतात’ या शीर्षकांतर्गत रेल्वेस्थानकावरील अव्यवस्थेकडे लक्ष वेधले होते. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होतात या वृत्ताची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेऊन मंगळवारी महापालिकेच्या कांजी हाऊस विभागाच्या पथकास पाचारण केले. पथकाने जाळीच्या साह्याने रेल्वेस्थानकावरील कुत्र्यांना पकडले. यानंतरही ही कारवाई सुरू ठेवण्याचे आश्वासन कांजी हाऊस विभागाने रेल्वे प्रशासनास दिले.

ठळक मुद्देजाळी लावून पकडले : प्रशासनाने केली त्वरित कारवाईलोकमतचा प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरात मंगळवारी मोकाट कुत्र्यांना जाळी लावून पकडण्यात आले. रेल्वे प्रशासनाने महापालिकेच्या कांजी हाऊस विभागाच्या सहकार्याने हे अभियान राबविले. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी ‘कुत्रे गुरगुरतात, लाईटही बंद असतात’ या शीर्षकांतर्गत रेल्वेस्थानकावरील अव्यवस्थेकडे लक्ष वेधले होते. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होतात या वृत्ताची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेऊन मंगळवारी महापालिकेच्या कांजी हाऊस विभागाच्या पथकास पाचारण केले. पथकाने जाळीच्या साह्याने रेल्वेस्थानकावरील कुत्र्यांना पकडले. यानंतरही ही कारवाई सुरू ठेवण्याचे आश्वासन कांजी हाऊस विभागाने रेल्वे प्रशासनास दिले.लवकरच ऐकावयास मिळेल संगीत‘लोकमत’ने नागपूर रेल्वेस्थानकावर म्युझिक सिस्टीम प्रकल्प थंडबस्त्यात पडल्यामुळे याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याबाबत रेल्वेस्टेशनचे संचालक दिनेश नागदेवे यांनी सांगितले की, रेल्वेस्थानकावर म्युझिक सिस्टीम सुरू करण्यात आली होती. परंतु काही प्रवाशांनी शास्त्रीय संगीत वाजविण्याची तर काहींनी जुनी गाणी वाजविण्याची मागणी केली होती. त्यामुळे हे संगीत आठवडाभरात बंद करावे लागले. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर स्टेशन प्रशासनाने म्युझिक सिस्टीम पुन्हा सुरू करण्याबाबत ‘डीआरएम’ मनिंदर सिंह उप्पल यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.एस्केलेटरवर होणार कर्मचारी तैनात‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तात एस्केलेटरजवळ एकही रेल्वे कर्मचारी उपस्थित राहत नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. याबाबत स्टेशन संचालक दिनेश नागदेवे यांनी एस्केलेटरसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आल्याची माहिती दिली. सोबतच कर्मचाऱ्यांसाठी एसएमएस सिस्टीम विकसित करण्यात येत आहे. एस्केलेटरजवळ आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास एसएमएसच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जाईल. याशिवाय एस्केलेटर आॅटोचालक आणि असामाजिक तत्त्वांकडून बंद करण्यात येत असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. याबाबत लोहमार्ग पोलीस निरीक्षक डाबरे आणि रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांनाही जवानांची ड्युटी लावण्यासाठी सांगण्यात येणार आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरdogकुत्रा