शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

‘सीएम वॉररुम’मधून निवडणुकांच्या तयारीवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 12:44 IST

आगामी निवडणुकांच्या मोहिमेसाठी भारतीय जनता पक्षाने आपली समांतर व्यवस्था उभी केली आहे. ‘पेजप्रमुख’, ‘बूथप्रमुख’, शक्ती केंद्रप्रमुख आणि विस्तारकांची ‘टीम’च बनली असून, त्याला थेट ‘सीएम वॉररुम’शी जोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देभाजपाची समांतर व्यवस्था शक्ती केंद्रप्रमुखांसोबत थेट संवाद

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी निवडणुकांच्या मोहिमेसाठी भारतीय जनता पक्षाने आपली समांतर व्यवस्था उभी केली आहे. ‘पेजप्रमुख’, ‘बूथप्रमुख’, शक्ती केंद्रप्रमुख आणि विस्तारकांची ‘टीम’च बनली असून, त्याला थेट ‘सीएम वॉररुम’शी जोडण्यात आले आहे.उल्लेखनीय आहे की, भाजपात संघटनेला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. शहर कार्यकारिणीसोबतच प्रत्येक मंडळाचीदेखील वेगळी कार्यकारिणी आहे, ज्यात मंडळ अध्यक्ष, महामंत्री, मंत्री, प्रमुख अध्यक्ष इत्यादींचा समावेश आहे. पक्षाचे वरिष्ठ नेतादेखील याच्याशी जुळलेले आहेत.दरवेळी या चमूवर मोठी जबाबदारी असते. मात्र यंदा पक्षाने समांतर व्यवस्था तयार केली आहे. मतदार यादीच्या प्रत्येक पानासाठी एक ‘पेजप्रमुख’ व प्रत्येक ‘बूथ’चा प्रमुख अगोदरपासूनच कार्यरत आहे. यावेळी या संकल्पनेचा विस्तर करीत दोन ते तीन बूथप्रमुखांवर एक शक्ती केंद्रप्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत.त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी विस्तारक बनविण्यात आले आहेत. ही संपूर्ण चमू संघटनमंत्र्यांच्या नियंत्रणात आहे. त्यांना थेट पुणे व भार्इंदर येथे स्थापित ‘सीएम वॉररुम’शी जोडण्यात आले आहे. त्यांना तेथूनच दिशानिर्देश आणि पक्षाच्या निवडणूक कार्यक्रमांची माहिती देण्यात येत आहे.मंगळवारी पक्षाचे प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी ‘मोबाईल कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून शक्तिप्रमुखांशी थेट चर्चा करून त्यांना मार्चपर्यंतच्या कार्यक्रमांची माहिती दिली.मागील आठवड्यात उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या शक्ती केंद्रप्रमुखांच्या संमेलनात देण्यात आलेल्या ‘किट’मधील अर्जात केंद्रप्रमुखांना आपल्या क्षेत्राची संपूर्ण माहिती द्यायची आहे; सोबतच त्यांना सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांची यादी देण्यात आली आहे. सर्वांना महाराष्ट्र भाजपा नावाच्या ‘अ‍ॅप’ने जोडण्यात आले आहे. या ‘अ‍ॅप’मध्ये शक्ती केंद्र व पेजप्रमुखांचे फोटो व नाव देण्यात आले आहेत.‘सीएम वॉररुम’च्या सक्रियतेमुळे निवडणुकीच्या मोहिमेला एकरूपता मिळते आहे. तेथून सातत्याने संदेश येत आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यक्रमांची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते पेजप्रमुखांना होत आहे. याचा निवडणुकीत फायदा होईल, अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस