शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृती टिकण्यात शास्त्रीय कलांचे योगदान : श्रीनिवास वरखेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 23:33 IST

संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्यांचे सूत्र पुढे नेणारे शास्त्र म्हणजेच कला असल्याची भावना कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसंस्कृती महोत्सवाचा समारोपएकल व समूह नृत्य स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कलेच्या आविष्कारात संस्कृतीची धारणा असते आणि संस्कृती टिकण्यात आपल्या शास्त्रीय कलांचे अनन्यसाधारण योगदान राहिले आहे. संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्यांचे सूत्र पुढे नेणारे शास्त्र म्हणजेच कला असल्याची भावना कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी व्यक्त केली.कालिदास विश्वविद्यालयातर्फे आयोजित संस्कृत महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर आर्ट ऑफ लिव्हिंगचे आचार्य स्वामी हरीहर, विश्वविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मधुसुदन पेन्ना, अधिष्ठाता नंदा पुरी, संयोजक डॉ. कृष्णकुमार पाण्डेय, कुलसचिव डॉ. सी.जी. विजयकुमार, समन्वयक डॉ. प्रसाद गोखले उपस्थित होते.यावेळी, विद्यापीठाच्या विस्तार सेवा मंडळांतर्गत प्राजक्त बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने ८ ते १५ आणि १६ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी एकल व समूह कथ्थक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले. ही नृत्य स्पर्धा संस्थेच्या सदस्य नृत्यगुरु प्राचार्या स्वाती भालेराव यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली. कथ्थक नृत्य मंदिर, नरकेसरी लेआऊट, जयप्रकाश नगर येथे आयोजित या स्पर्धेचे परीक्षण श्वेता गर्गे आणि प्रगती वाघमारे यांनी केले. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या स्पर्धेत एकल नृत्याच्या ८ ते १५ च्या वयोगटात प्रथम क्रमांक मेखला हेजीब, द्वितीय स्वानंदी ठेंगडी, तृतीय इशिता डे आणि चिन्मयी दशरथ तर प्रोत्साहन पुरस्कार आर्या पाठक यांना देण्यात आले. समूह नृत्यात आर्या पाठक, श्रीपर्णा देशमुख, ध्रुव सालोडकर यांना विजयी जाहीर करण्यात आले. १६ ते २५ वयोगटात प्रथम प्राजक्ता पुराणिक, द्वितीय केतकी ताह्मणकर आणि निकिता भडांगे, तृतीय नदीम काळे आणि उत्तेजनार्थ पारितोषिक मृणाल दळवेकर यांना देण्यात आले. समूह नृत्यात अनुष्का संत, सई ओक, नुपूर क्षीरसागर आणि तांडव समूहाला विजयी जाहीर करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन प्राजक्त बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चारुदत्त मोडक आणि प्राचार्या स्वाती भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. मदन सेनाड, कार्याध्यक्ष मनोज वढूळकर उपस्थित होते.

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकartकला