शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वीज जनित्र सेवेचे कंत्राट संपले

By admin | Updated: June 21, 2017 02:21 IST

वीज जनित्र सेवेचा करार एक वर्षापूर्वी संपल्याने वीज पुरवठा खंडित होताच ‘बॅकअप’अभावी मध्येच लिफ्ट बंद पडण्याचे प्रमाण वाढले

न्यायमंदिरातील लिफ्ट पडताहेत बंद : वकील, नागरिक त्रस्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीज जनित्र सेवेचा करार एक वर्षापूर्वी संपल्याने वीज पुरवठा खंडित होताच ‘बॅकअप’अभावी मध्येच लिफ्ट बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून भविष्यात एखाद्या मोठ्या धोक्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोमवारी दुपारी १२.२५ वाजताच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित होऊन न्यायमंदिर इमारतीतील लिफ्ट बंद पडल्या. त्यापैकी उत्तर भागाकडील अधिक क्षमतेची एक नवीन लिफ्ट पाच आणि सहा मजल्यांच्या मध्ये फसून दहा- बारा जण अडकले. ते सर्व अर्धा तासपर्यंत अडकून पडले होते. सहा महिन्यांपूर्वीही अशीच घटना घडून वकील आणि पक्षकार सुमारे दीड तास लिफ्टमध्ये अडकले होते. सोमवारी अडकलेल्या लिफ्टमध्ये अंधार होता, साधे व्हेन्टिलेशनही नव्हते. आकस्मिकप्रसंगी संपर्क साधावयाच्या अभियंत्यांची, इलेक्ट्रिशियनच्या नावाची यादी लिफ्टमध्ये असते. परंतु अंधार असल्याने ही यादीही कुणाला दिसत नव्हती. लिफ्टमध्ये अडकलेल्यांमध्ये ज्येष्ठ सरकारी वकील ज्योती वजानी होत्या. त्यांनी मोबाईल टॉर्च सुरू करून संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क करून लिफ्ट अडकल्याची माहिती दिली होती. काळजीवाहक साखळकर आणि इतरांनी धावपळ केली होती. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर कुणीतरी आठव्या मजल्यावर गेले, लिफ्टला पाचव्या मजल्यावर आणून साऱ्यांची सुटका झाली. अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. लिफ्टमध्ये अडकलेल्यांमध्ये सुदैवाने कोणीही हृदयरोगी किंवा अस्थमा रोगी नव्हते. असे रोगी अधिक काळ लिफ्टमध्ये अडकल्यास आॅक्सिजनअभावी त्यांचा गुदमरून मृत्यू होऊ शकतो, अशी भीती काही जाणकारांनी व्यक्त केली. लिफ्टमध्ये अडकल्याने पक्षकार आणि वकिलांचा अर्ध्या तासाचा खोळंबा झाल्याने त्यांची न्यायालयातील कामेही रखडली होती. न्याय मंदिर इमारतीमध्ये आठ लिफ्ट आहेत. त्यापैकी दोन लिफ्ट न्यायाधीशांसाठी आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वकील, पक्षकार, पोलीस, आरोपी आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची लिफ्टमध्ये तोबा गर्दी असते. आठव्या मजल्यावर न्यायालय कक्ष सुरू करण्यात आल्याने या ठिकाणी दिवाणी न्यायालये आणि अपघात दाव्यांच्या न्यायालयांचे कामकाज चालते. दिवाणी न्यायालयात जाणाऱ्यांची गर्दी अधिक असते तरअपघात दाव्यांच्या न्यायालयात दिव्यांग व्यक्तींची गर्दी असते. त्यांना लिफ्टशिवाय पर्याय नसतो. दरम्यान बंद लिफ्टमधून सुटका होताच ज्योती वजानी यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश विलास डोंगरे यांचे केबिन गाठून त्यांना घटनेची माहिती दिली. सह्याची मोहीम राबवून जिल्हा वकील संघटनेलाही निवेदन देण्यात आले. वीज खंडित झाली असली तरी तिचे बॅकअप कायम राहण्यासाठी वीज जनित्राचा सेवा करार कायम चालू ठेवण्यात यावा, भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी काळजी घेण्यात यावी,अशी मागणी वकिलांनी केली आहे.