शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी वकील होण्यासाठी निरंतर ज्ञानार्जन करा  : न्या. मिलिंद जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:14 IST

यशस्वी वकील होण्यासाठी निरंतर ज्ञानार्जन व व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी बुधवारी व्यक्त केले.

ठळक मुद्देहायकोर्ट बार असोसिएशनचा कार्यक्रम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : यशस्वी वकील होण्यासाठी निरंतर ज्ञानार्जन व व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी बुधवारी व्यक्त केले.हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या वतीने ‘स्टडी सर्कल’ उपक्रमांतर्गत न्या. जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी नवोदित वकिलांना सखोल मार्गदर्शन केले. ‘वकील म्हणून माझे जीवन’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. उत्कृष्ट वकील म्हणून स्वत:ला विकसित करण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास करणे, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविणे, शारीरिक हालचाली नियंत्रित ठेवणे व संवादकौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. वकिली व्यवसायात प्रवेश केल्यानंतर मी सर्वप्रथम याच गोष्टींवर परिश्रम घेतले. तसेच, मार्गदर्शक वरिष्ठ वकिलांच्या कार्यालयात वावरताना ती एक शाळा आहे ही आपली भावना असली पाहिजे. वरिष्ठांच्या कार्यालयातून शक्य होईल तेवढे ज्ञान गोळा करावे. तो ठेवा आयुष्यभर पुरतो असे न्या. जाधव यांनी सांगितले.नोकरीमध्ये समाधान मिळाले नाही म्हणून वकिली व्यवसायात आलो होतो. त्यापूर्वी रिलायन्सचे धीरुभाई अंबानी यांचे जीवनचरित्र वाचनात आल्यामुळे काहीतरी वेगळे करण्याची प्रेरण मिळाली होती. आईवडील सरकारी कर्मचारी होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर मध्य रेल्वेत नोकरी मिळाली होती. वकिली करण्यासाठी ती नोकरी सोडली अशी माहितीही न्या. जाधव यांनी यावेळी दिली. संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड. गौरी वेंकटरमण, उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील व सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर व्यासपीठावर उपस्थित होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल