शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘एलआयटी’मधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू ठेवा : हायकोर्टाचा ग्रीन सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:17 IST

लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) येथील प्राध्यापकाची २९ आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे १ ही ३० रिक्त पदे भरण्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ग्रीन सिग्नल दिला. पदभरतीची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता या पदभरतीला लागू होणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देआचारसंहिता लागू होणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) येथील प्राध्यापकाची २९ आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे १ ही ३० रिक्त पदे भरण्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ग्रीन सिग्नल दिला. पदभरतीची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता या पदभरतीला लागू होणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.यासंदर्भात एलआयटी माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य प्रसन्न सोहळे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पदभरतीची प्रक्रिया थांबवून ठेवण्यात आल्याची माहिती देऊन यासंदर्भात आवश्यक आदेश देण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता ही विनंती मान्य केली.एलआयटी ख्यातनाम संस्था असून या संस्थेचे विद्यार्थी जगभरात उच्च पदावर कार्यरत आहेत. परंतु, गेल्या काही वर्षापासून संस्थेकडे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. संस्थेत प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसह विविध आवश्यक सुविधांचा अभाव आहे. परिणामी संस्थेचे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यापासून वंचित रहात आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावत चालली आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. रिक्त पदे भरण्यासह एलआयटीला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देण्यात यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रोहित जोशी, विद्यापीठातर्फे अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील तर, एलआयटीतर्फे अ‍ॅड. नितीन लांबट यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयElectionनिवडणूक