शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचा अवमान करणाऱ्या वकिलाला हायकोर्टाचा दणका अन् दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 20:35 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकील अरविंद वाघमारे यांच्यावरील अवमानना कारवाईची बुधवारी दिवसभर चर्चा राहिली. वाघमारे यांना त्यांच्याविरुद्ध नवीन अवमानना नोटीस जारी झाल्यामुळे सुरुवातीला दणका सहन करावा लागला तर, त्यानंतर त्यांनी स्वत:ची चूक सुधारून बिनशर्त माफी मागितल्यामुळे अवमानना नोटीस रद्द होऊन त्यांना दिलासा मिळाला. तेव्हापर्यंत मात्र, वाघमारे यांचे काय होते हाच भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. प्रकरणावरील सुनावणी पाहण्यासाठी शेकडो वकिलांनी न्यायालयात गर्दी केली होती.

ठळक मुद्देप्रकरणाची दिवसभर चर्चा, बघ्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकील अरविंद वाघमारे यांच्यावरील अवमानना कारवाईची बुधवारी दिवसभर चर्चा राहिली. वाघमारे यांना त्यांच्याविरुद्ध नवीन अवमानना नोटीस जारी झाल्यामुळे सुरुवातीला दणका सहन करावा लागला तर, त्यानंतर त्यांनी स्वत:ची चूक सुधारून बिनशर्त माफी मागितल्यामुळे अवमानना नोटीस रद्द होऊन त्यांना दिलासा मिळाला. तेव्हापर्यंत मात्र, वाघमारे यांचे काय होते हाच भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. प्रकरणावरील सुनावणी पाहण्यासाठी शेकडो वकिलांनी न्यायालयात गर्दी केली होती.उच्च न्यायालयात वाघमारे व इतर चौघांविरुद्ध फौजदारी अवमानना याचिका प्रलंबित आहे. ती याचिका न्यायालयाने स्वत:च दाखल करून घेतली आहे. तसेच, या कारवाईविरुद्ध वाघमारे व इतरांनी अपील दाखल केले आहे. या दोन्ही प्रकरणांवर बुधवारी न्यायमूर्तीद्वय झेड.ए. हक व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी होती. पहिल्या सत्रात सुनावणी सुरू झाल्यानंतर वाघमारे यांनी न्यायालयाचा अवमान करणारी कृती केली. त्यामुळे न्यायालयाने त्यांची चांगलीच कानउघाडणी करून त्यांच्याविरुद्ध नवीन अवमानना नोटीस जारी केली व पोलिसांना बोलावून त्यांना ताब्यात घेण्याचा आदेश दिला. पोलिसांनी लगेच त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर हे प्रकरण दुसऱ्यासत्रामध्ये सुनावणीसाठी घेण्यात आले असता वाघमारे यांनी विस्तृत स्पष्टीकरणासह माफीनामा सादर करून अवमानना कारवाई रद्द करण्याची विनंती केली. न्यायालयाने त्यांचे तत्काळ बदललेले रूप पाहता त्यांना माफ करण्याची तयारी दर्शविली, पण त्यासाठी त्यांना बिनशर्त माफी मागण्यास सांगण्यात आले. त्यांनी विस्तृत स्पष्टीकरणासह सादर केलेला माफीनामा स्वीकारण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर काही वेळाने प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आले. दरम्यान, वाघमारे यांनी नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करून बिनशर्त माफी मागितली. न्यायालयाने त्यांना माफ करून नवीन अवमानना कारवाई रद्द केली. तसेच, जुन्या अवमानना प्रकरणावर २ एप्रिल रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. वाघमारे यांनी स्वत: बाजू मांडली. न्यायालय मित्र म्हणून अ‍ॅड. रजनीश व्यास तर, उच्च न्यायालय प्रशासनातर्फे वरिष्ठ वकील आनंद जयस्वाल व अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.शिक्षा करून आनंद मिळत नाहीवकिलांना शिक्षा करून आम्हाला कोणताही आनंद मिळत नाही. परंतु, परिस्थिती खूपच गंभीर झाल्यास कारवाई करणे आवश्यक होऊन जाते असे मौखिक मत न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्त केले. तसेच वाघमारे यांना योग्य समज देऊन भविष्यात पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल