शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 23:10 IST

शाळा हस्तांतरणाचा आदेश अवैधरीत्या जारी केल्यामुळे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार कीर्तीकुमार भांगडिया व अन्य प्रतिवादींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अवमानना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला. तसेच, मनमानी पद्धतीने निर्णय घेण्याच्या प्रवृत्तीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

ठळक मुद्देहायकोर्ट : अवैधरीत्या जारी केला शाळा हस्तांतरणाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळा हस्तांतरणाचा आदेश अवैधरीत्या जारी केल्यामुळे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार कीर्तीकुमार भांगडिया व अन्य प्रतिवादींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अवमानना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला. तसेच, मनमानी पद्धतीने निर्णय घेण्याच्या प्रवृत्तीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्यासमक्ष या प्रकरणावर सुनावणी झाली. अन्य प्रतिवादींमध्ये शालेय शिक्षण विभागाचे सचिव, नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी व गांधी शिक्षण सेवा समिती यांचा समावेश आहे. चिमूर येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्थेने वादग्रस्त आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.चिमूर येथील राष्ट्रीय विद्यालय आधी गांधी शिक्षण सेवा समितीद्वारे संचालित करण्यात येत होते. २३ फेब्रुवारी २००१ रोजी शिक्षण उपसंचालकांनी या विद्यालयाची मान्यता मागे घेतली. त्याविरुद्ध समितीने शिक्षण संचालकांकडे दाखल केलेले अपीलही खारीज झाले. त्यानंतर ३१ डिसेंबर २००१ रोजी शालेय शिक्षण सचिवांनी याचिकाकर्त्या संस्थेला २००१-२००२ या सत्रापासून अनुदानित तत्त्वावर ही शाळा चालविण्याची परवानगी दिली. शाळेत सध्या ८०० विद्यार्थी शिक्षण घेत असून आतापर्यंत एकही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरला नाही. ३१ डिसेंबर २००१ रोजीच्या निर्णयावर गांधी शिक्षण सेवा समितीने २०१५ पर्यंत काहीच आक्षेप घेतला नाही. २०१५ मध्ये समितीने ही शाळा परत मिळविण्यासाठी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्यामार्फत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला. तावडे यांनी दिखाऊ औपचारिकता पूर्ण करून १० जुलै २०१५ रोजी याचिकाकर्त्यांना शाळा हस्तांतरणावर सुनावणीची नोटीस बजावली. परिणामी, याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ४ आॅगस्ट २०१७ रोजी उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देऊन वादग्रस्त नोटीस रद्द केली. असे असताना ७ आॅगस्ट २०१८ रोजी तावडे व सचिवांनी ही शाळा गांधी शिक्षण सेवा समितीला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी दुसऱ्यांदा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात त्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याची बाब लक्षात घेता सर्व प्रतिवादींना अवमानना नोटीस बजावली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. ए. झेड. जिभकाटे व अ‍ॅड. पी. ए. जिभकाटे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयVinod Tawdeविनोद तावडे