शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील सावनेरच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:26 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात सावनेरच्या उपविभागीय दंडाधिकारी वर्षादेवी भोसले यांना अवमानना नोटीस बजावून स्वत:वरील आरोपांवर ३० नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिलेत. प्रकरणावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

ठळक मुद्देहायकोर्ट : निर्णयाचे पालन केले नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात सावनेरच्या उपविभागीय दंडाधिकारी वर्षादेवी भोसले यांना अवमानना नोटीस बजावून स्वत:वरील आरोपांवर ३० नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिलेत. प्रकरणावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.भोसले यांच्याविरुद्ध रसपालसिंग मरास यांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. मरास यांनी १२ खोल्यांमध्ये लॉजिंग अ‍ॅन्ड बोर्डिंगची परवानगी मिळविण्यासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. पोलिसांचा अहवाल लक्षात घेता तो अर्ज खारीज करण्यात आला होता. संबंधित ठिकाण जंगल व कन्हान नदीच्या जवळ आहे. त्यामुळे तरुण जोडपी तेथे जाऊन व्याभिचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पोलीस अहवालात नमूद करण्यात आले होते. त्या आदेशाविरुद्ध मरास यांनी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ती याचिका मंजूर करून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा वादग्रस्त आदेश रद्द केला होता. असे असतानाही उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मरास यांना लॉजिंग अ‍ॅन्ड बोर्डिंगची परवानगी दिली नाही. त्यामुळे मरास यांनी अवमानना याचिका दाखल केली आहे.प्रकरणावरील सुनावणीदरम्यान, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी स्वत:ची बाजू स्पष्ट करताना मरास यांनी १२ खोल्या बांधल्या नसल्याचे सावनेर तहसीलदाराच्या अहवालाचा आधार घेऊन सांगितले. तसेच, मरास यांच्याकडे १२ खोल्या बांधण्याचा मंजूर आराखडा नसल्याची माहितीही दिली. त्याच्या प्रत्युरात मरास यांनी संबंधित ठिकाणी १२ खोल्या बांधल्या असल्याचे ठामपणे सांगितले. त्यासंदर्भात आधीच्या याचिकेमध्ये केलेल्या वक्तव्याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यानंतर न्यायालयाने सर्व बाबी विचारात घेता उपविभागीय अधिकारी जाणीवपूर्वक न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करणे टाळत असल्याचे निरीक्षण नोंदवले व भोसले यांना अवमानना नोटीस बजावली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. शशिभूषण वाहणे व अ‍ॅड. रसपालसिंग रेणू यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे