शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील मॅपल ज्वेलर्सला हायकोर्टाची अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 23:47 IST

बेहिशेबी ५ कोटी ७३ लाख रुपयांसाठी बँक हमी सादर करण्यात अपयशी ठरलेल्या मुंबईतील मॅपल ज्वेलर्सला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अवमानना नोटीस बजावली व यावर दोन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देबेहिशेबी ५ कोटी ७३ लाख रुपयाचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेहिशेबी ५ कोटी ७३ लाख रुपयांसाठी बँक हमी सादर करण्यात अपयशी ठरलेल्या मुंबईतील मॅपल ज्वेलर्सला मुंबईउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अवमानना नोटीस बजावली व यावर दोन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.२५ मार्च २०१९ रोजी मॅपल ज्वेलर्सने ही बेहिशेबी रक्कम परत मिळविण्यासाठी बँक हमी सादर करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने बँक हमी सादर करा व ही रक्कम घेऊन जा असे निर्देश मॅपल ज्वेलर्सला दिले होते. परंतु, मॅपल ज्वेलर्सने स्वत:चा शब्द पाळला नाही. आयकर विभागाने याकडे लक्ष वेधले असता न्यायालयाने मॅपल ज्वेलर्सला फटकारले. तसेच, अवमानना नोटीस बजावली. या बेहिशेबी रकमेसाठी आयकर विभागाने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. कायद्यानुसार ही रक्कम आयकर विभागाच्या तिजोरीत जमा होणे आवश्यक आहे विभागाचे म्हणणे आहे.नंदनवन पोलिसांनी २९ एप्रिल २०१८ रोजी पहाटे २.३० च्या सुमारास पारडी मार्गावरील प्रजापती चौकाजवळ एमएच ३१/एफए/४६११ क्रमांकाची कार ताब्यात घेतली होती. कार नंदनवन ठाण्यात आणल्यानंतर मनीष खंडेलवाल या व्यक्तीने कारमधील लॉकरची चावी उपलब्ध करून देऊन त्यात ५ कोटी ७३ लाख रुपये असल्याची माहिती दिली. रोकड मोजल्यानंतर ती केवळ ३ कोटी १८ लाखच भरली. त्यामुळे कारमधील २ कोटी ५५ लाख रुपये लंपास करण्यात आल्याचा आरोप मनीषने केला. त्यानंतर आवश्यक कारवाई करून लंपास झालेली रक्कम परत मिळविण्यात आली. ही सर्व रक्कम आपली आहे, असा दावा मॅपल ज्वेलर्स करीत आहे. आयकर विभागातर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबई