शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

नागपुरात दूषित पाणीपुरवठा, नळातून किडे अन् लार्व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:30 IST

मोहननगरातील लाला जयनारायण मार्ग, चौरसिया चौक, परिसरात सेंट जोसेफ स्कूलच्या मागील भागातील वस्त्यातील नागरिकांना एक तास पाणीपुरवठा होतो. यात अर्धातास नळाला दूषित पाणी येते.

ठळक मुद्देमोहननगर, गड्डीगोदाम भागात पाणीटंचाई : दूषित पाण्यामुळे आजार वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोहननगरातील लाला जयनारायण मार्ग, चौरसिया चौक, परिसरात सेंट जोसेफ स्कूलच्या मागील भागातील वस्त्यातील नागरिकांना एक तास पाणीपुरवठा होतो. यात अर्धातास नळाला दूषित पाणी येते. पाण्यासोबतच किडे आणि लार्वा येतो. मोहननगरलगतच्या गड्डीगोदाम, परदेशीपुरा, सुंदरबाग यासह अनेक भागात पाण्याची समस्या आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोेरे जावे लागत असल्याची व्यथा या भागातील नागरिकांनी मांडली.हॅन्डपंपाला दूषित पाणीमोहननगर व गड्डीगोदामच्या अनेक भागात हँडपंप आहेत. अनेक भागात नळाला पाणी येत नसल्याने हॅडपंपची मदत होते. परंतु हॅडपंपालाही दूषित पाणी येत असल्याने याचा उपयोग होत नाही.नाल्यात जुन्या लाईनमोहननगर व गड्डीगोदाम भागातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात अजूनही जुनी पाईपलाईन आहे. लाईन लिकेज असल्याने नळाला दूषित पाणी येते. मोहननगर भागातील नाल्याची मागील अनेक महिन्यात स्वच्छ करण्यात आलेली नाही. याच नाल्यातून पाण्याची लाईन गेली आहे. गड्डीगोदाम व परदेशीपुरा भागातील नालाही तुंबला आहे. या नाल्यातूनही पाण्याची लाईन गेली आहे.विहिरीकडे दुर्लक्षया भागात जुन्या विहिरी आहेत. परंतु प्रशासनाचे लक्ष नसल्याने विहिरी कचऱ्यामुळे बुजल्या आहेत. काही विहिरींवर अतिक्रमण झाले आहे. गड्डीगोदाम परिसरातील सुंदरबाग येथील विहिरीवर अतिक्रमण केले असल्याने या विहिरीवरून होणारा पाणीपुरवठा बंद आहे.पाण्यातून निघतात किडेनळाच्या पाण्यासोबतच किडे निघत असल्याची माहिती मोहननगर येथील रहिवासी ज्ञानचंद कनोजिया यांनी सांगितली. परंतु पर्याय नसल्याने या पाण्याचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने हॅन्डपंपाच्या दूषित पाण्याचा वापर करावा लागतो.दुसऱ्या भागातून पाणी आणावे लागतेया भागात सार्वजनिक नळावरून पाणी भरावे लागते. परंतु नळाला दूषित पाणी येत असल्याने लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसापासून नळाला दूषित पाणी येत असल्याने दुसऱ्या भागातून लोकांना पाणी आणावे लागते. अशी माहिती दुकानदार मनीष लाडे यांनी दिली.पाण्याला दुर्गंधमोहननगर येथे पाण्याची भीषण टंचाई आहे. माझ्या घरातील नळाला अर्धा तासही पाणी येत नाही. अनेकदा नळाला पाणी येत नाही. सुरुवातीला नळाच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याची माहिती रंजना घोडे यांनी दिली.पाणी गाळूनच प्यावे लागतेनळाला दूषित पाणी येत असल्याबाबत लोकप्रतिनिधीकडे अनेकदा तक्रार केली. परंतु समस्या कायम आहे. त्यामुळे नाईलाज म्हणून दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. बोअरवेलच्या पाण्याला दुर्गंधी असल्याने पाण्याचा वापर करता येत नसल्याची माहिती गड्डीगोदाम येथील रहिवासी चंदा टेंभुर्णे यांनी दिली.अर्धा तासही पाणी येत नाहीपाण्यासाठी पहाटे उठावे लागते. पण नळाला अर्धा तासही पाणी येत नाही. पहाटे जाग आली नाही तर पाणी मिळत नाही. दिवसभर पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. नळ आल्यानतंर सुरुवातीला काहीवेळ दूषित पाणी येते. किडे असल्याने या पाण्याचा वापर करता येत नाही, अशी माहिती चंद्रकला सहारे यांनी दिली.वापरण्याजोगे पाणी नसतेनळाला दूषित पाणी येत असून त्यात किडे असतात. यामुळे पाण्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे मुख्य चौकात जाऊन पाणी आणावे लागते. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी कुणीही पुढाकार घ्यायला तयार नसल्याची व्यथा गड्डीगोदाम भागातील सुंदरबन येथील अशलीना चौधरी यांनी मांडली.नवीन नळ कनेक्शनची प्रतीक्षापाण्याची नवीन लाईन टाकण्यात आलेली आहे. आमच्या घरी नळ नाही. नळ कनेक्शन मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सार्वजनिक नळावरून पाणी आणावे लागते. येथेच कपडे धुवावे लागतात. पाण्याला दुर्गंधी असून दुषित पाणीपुरवठा होत असल्याची माहिती मीनाबाई मांडवतकर यांनी दिली.तक्रार करूनही समस्या कायमचौरसिया चौक भागात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होतो. यासंदर्भात महापालिक  प्रशासनाकडे तक्रार केली. दूषित पाण्याचे नमुने दिले. अधिकारी आले, त्यांनी या भागाची पाहणी केली. परंतु आजही समस्या कायम असल्याची व्यथा चौरसिया चौक येथील रहिवासी बीना गायकवाड यांनी मांडली.थोडाच वेळ नळाला पाणीसेंट जोसेफ स्कूल गल्लीत पाण्याची समस्या कायम आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ही समस्या आणखी तीव्र बनली आहे. नळाला काहीवेळ पाणी येते. त्यातही दूषित पाण्याचा पुरवठा होतो. यामुळ अडचणींचा सामना करावा लागतो, अशी माहिती दिनेश मोहिते यांनी दिली.नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठामोहननगर येतील रहिवासी रितेश वल्लूरवार म्हणाले, मोहननगर येथील नाला कचºयामुळे तुंबला आहे. मागील काही महिन्यात नाल्याची साफसफाई करण्यात आलेली नाही. या नाल्यातूनच गेलेली नळाची पाईपलाईन लिकेज असल्याने नळाला दूषित पाणी येते. ही लाईन बदलवण्याची गरज आहे.पाणीपुरवठा होत नाहीशिव मंदिर परिसरातील वस्त्यांतील नळ कोरडे पडलेले आहे. अजिबात पाणीपुरवठा होत नाही. या भागात जुनी लाईन आहे. नवीन लाईनचे काम अर्धवट असल्याने लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची माहिती छाया जत्तलवार यांनी दिली.पाणी समस्येकडे दुर्लक्षगड्डीगोदाम भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. जुन्या लाईनवर नळ आहेत परंतु ही लाईन जीर्ण झाली आहे. लिकेज असल्याने नळाला दूषित पाणी येते. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही समस्या मार्गी लागत नसल्याचे सामाजिक कार्यक र्ते जयंत टेंभूरकर यांनी सांगितले.पाण्यासाठी करावी लागते भटकंतीनळाला पुरेसे पाणी येते नाही. कधीकधी दोन दिवस नळ येत नाही. अशा परिस्थितीत आजूबाजूच्या वस्त्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यातच नळाला दूषित पाणी येत असल्याने नागरिकांना संकटांचा सामना करावा लागतो, अशी व्यथा देवचंद भोतमांगे यांनी मांडली.पाण्याची नवीन लाईन टाकावीनळाची पाईपलाईन नाल्यातून गेलेली आहे. ही लाईन जुनी असल्याने ठिकठिकाणी लिकेज आहे. यामुळे नळाला दूषित पाणी येते. यात अनेकदा किडे असतात. या भागात पाण्याची नवीन लाईन टाकण्याची गरज असल्याचे परदेशीपुरा येथील रहिवासी द्रौपदी पकिड्डे यांनी सांगितले.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणnagpurनागपूर