शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

ग्राहक मंच : मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 20:14 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला जोरदार चपराक बसली.

ठळक मुद्देतक्रारकर्त्याला ९० हजार रुपये भरपाई मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला जोरदार चपराक बसली.विजय बजाज असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव आहे. बजाज यांना २५ हजार ७३६ रुपये १२ टक्के व्याजासह परत करण्यात यावे व ९० हजार रुपये भरपाई अदा करण्यात यावी असे आदेश मंचने मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला दिले आहेत. व्याज ३ जून २०१६ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. भरपाईमध्ये शारीरिक-मानसिक त्रासाचे ८० हजार व तक्रार खर्चाचे १० हजार रुपयाचा समावेश आहे. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी प्रकरणावर निर्णय दिला. आदेशांवर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.तक्रारीतील माहितीनुसार, बजाज यांनी स्वत:सह पत्नी, मुलगा, मुलगी व पुतण्या यांचे नागपूर येथून इंग्लंडला जाण्याकरिता आणि तेथून स्कॉटलंडमध्ये जाऊन दोन दिवस व दोन रात्र राहण्याकरीता मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला ४९ हजार ६३५ रुपये अदा केले होते. बजाज यांच्याकरिता स्कॉटलंड येथे हॉटेल आरक्षित करण्यात आले होते. त्यांना इंग्लंडपर्यंतच्या प्रवासात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवली नाही. परंतु, २८ मे २०१६ रोजी स्कॉटलंडकडे प्रस्थान केल्यानंतर हॉटेलचे आरक्षण रद्द झाल्याचे कळविण्यात आले. त्यानंतर कंपनीने दुसऱ्या हॉटेलमधील केवळ एका खोलीत राहण्याची पर्यायी व्यवस्था केली. त्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या. तसेच, त्यांना खोली रिकामी होण्यासाठी सहा तास प्रतीक्षा करावी लागली व अतिरिक्त ३८ हजार रुपयेही भरावे लागले. त्याचा सर्वांना प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास झाला. परिणामी, बजाज यांनी ३ सप्टेंबर २०१६ रोजी कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून ४९ हजार ६३५ रुपये परत मागितले. परंतु, कंपनीने केवळ २३ हजार ८९९ रुपयेच परत केले. करिता बजाज यांनी मंचमध्ये धाव घेतली होती.मंचने नोटीस बजावल्यानंतर कंपनीने लेखी उत्तर दाखल करून त्यांची काहीच चूक नसल्याचा दावा केला व बजाज यांची तक्रार खारीज करण्याची मागणी केली. अंतिम सुनावणीनंतर मंचने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून वरीलप्रमाणे आदेश दिले.मनस्ताप सहन करावा लागलाकंपनीच्या चुकीमुळे तक्रारकर्त्यास अपरिचित ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागला. तक्रारकर्त्याची अत्यंत गैरसोय झाली. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याला आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे ते आवश्यक दिलासा मिळण्यास पात्र आहेत असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

 

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे