शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

ग्राहक मंच : मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:45 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकांच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला दणका बसला.

ठळक मुद्देग्राहकांच्या हिताचे विविध आदेश जारी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकांच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला दणका बसला. पीडित ग्राहकांचे ७१ हजार ३८ रुपये ९ टक्के व्याजासह परत करण्यात यावे आणि त्यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई अदा करावी, असे आदेश कंपनीला देण्यात आले. व्याज २० जून २०१७ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले. आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला एक महिन्याचा वेळ देण्यात आला.कंपनीविरुद्ध कैलाश सतीजानी व ओमप्रकाश हरिरमानी यांनी तक्रार दाखल केली होती. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून हे आदेश दिले. तक्रारकर्त्यांसह एकूण १५ जणांच्या समूहाने २४ ते २६ जून २०१७ पर्यंत मध्य प्रदेशातील पचमढी येथे सहलीला जाण्याची योजना आखली होती. त्यांनी मेक माय ट्रिप इंडिया कंपनीमार्फत वनस्थली हॉटेलमध्ये पाच वातानुकूलित खोल्या सकाळच्या न्याहारीसह आरक्षित केल्या होत्या. त्याकरिता कंपनीला ऑनलाईन पद्धतीने ७१ हजार ३८ रुपये अदा केले होते. परंतु, २३ जून २०१७ रोजी हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर त्यांच्या नावाने बुकिंग झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आठ तासाचा प्रवास केल्यानंतर महिला व मुलाबाळांसह सर्वांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच, मागे परत जाऊन पिपरिया येथील हॉटेलमध्ये रात्र काढावी लागली. कंपनीने दुसऱ्या दिवशीही त्यांना हॉटेल दिले नाही व पैसेही परत केले नाही. परिणामी, तक्रारकर्त्यांनी मंचमध्ये धाव घेतली होती. मंचची नोटीस तामील झाल्यानंतर कंपनीने लेखी उत्तर दाखल करून तक्रारीतील सर्व आरोप फेटाळले व तक्रार खारीज करण्याची मागणी केली. शेवटी मंचने हा निर्णय दिला.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे