शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

ग्राहक मंचचा आदेश : ग्राहकाचे ३.५४ लाख रुपये १८ टक्के व्याजाने परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 10:36 PM

तक्रारकर्त्या ग्राहकाचे ३ लाख ५४ हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने न्यू वैष्णवी लॅन्ड डेव्हलपर्स अ‍ॅन्ड प्रोमोटर्सला दिला आहे.

ठळक मुद्देन्यू वैष्णवी लॅन्ड डेव्हलपर्स अ‍ॅन्ड प्रोमोटर्सला दणका

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाचे ३ लाख ५४ हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने न्यू वैष्णवी लॅन्ड डेव्हलपर्स अ‍ॅन्ड प्रोमोटर्सला दिला आहे. व्याज २८ ऑगस्ट २०१४ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे.प्रकाश घाटे असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून ते स्नेहनगर येथील रहिवासी आहेत. त्यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी ५ हजार अशी एकूण २५ हजार रुपये भरपाईही मंजूर करण्यात आली होती. ही रक्कमदेखील डेव्हलपरनेच द्यायची आहे. आदेशांच्या अंमलबजावणीसाठी डेव्हलपरला ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर रोज २५ रुपये दंड लागू होईल असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी हे आदेश दिले आहेत.तक्रारीतील माहितीनुसार, घाटे यांनी न्यू वैष्णवी लॅन्ड डेव्हलपर्सच्या मौजा तरोडी (बु), ता. कामठी येथील ले-आऊ टमधील दोन भूखंड ५ लाख ४४ हजार रुपयात खरेदी करण्याचा करार केला होता. त्यानंतर घाटे यांनी डेव्हलपरला वेळोवेळी एकूण ३ लाख ५४ हजार रुपये अदा केले. तसेच, उर्वरित रक्कम देण्याची तयारी दर्शवून भूखंडांचे नोंदणीकृत विक्रीपत्र करून मागितले. परंतु, डेव्हलपरने विक्रीपत्र करून देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे घाटे यांनी डेव्हलपरला कायदेशीर नोटीस बजावली, पण डेव्हलपरने त्याला उत्तर दिले नाही. परिणामी, घाटे यांनी मंचमध्ये धाव घेतली होती. त्यावर मंचने डेव्हलपरला नोटीस बजावली. परंतु, ते मंचसमक्ष हजर झाले नाही. त्यामुळे मंचने घाटे यांच्या तक्रारीवर एकतर्फी कार्यवाही करून रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता वरीलप्रमाणे आदेश जारी केले.अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंबडेव्हलपरने भूखंडाचा कुठलाही मालकी हक्क नसताना आणि भूखंड विक्रीस आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबींची पूर्तता केली नसताना ग्राहकाकडून रक्कम स्वीकारली. हा अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब आहे. तसेच, डेव्हलपरने ग्राहकाला वादातील भूखंडांचे विक्रीपत्र करून दिले नाही व ग्राहकाला त्यांची रक्कमही परत केली नाही. ही कृती सेवेतील त्रुटी आहे असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले आहे.

टॅग्स :Nagpur District Additional Consumer Forumनागपूर जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे