लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने मनप्पुरम फायनान्स कंपनीला तक्रारकर्त्या ग्राहकाचा ट्रक परत करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे कंपनीला दणका बसला.हेमराज सोरटे असे ग्राहकाचे नाव असून ते हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, सोरटे यांनी मार्च-२०१९ मध्ये ट्रक खरेदी केला. त्यासाठी त्यांनी मनप्पुरम फायनान्स कंपनीकडून ७ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर त्यांनी नोव्हेंबर-२०१९ पर्यंत दर महिन्याला ३३ हजार ५०० रुपयांचा हप्ता जमा केला. परंतु, डिसेंबरचा हप्ता जमा करण्यास विलंब झाला. त्यामुळे मार्च-२०२० मध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सोरटे यांचा ट्रक जप्त केला. ही कारवाई करताना त्यांना नोटीस देण्यात आली नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक मंचमध्ये धाव घेतली. उपजीविका चालविण्यासाठी ट्रक मिळणे आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे होते. मंचने विविध बाबी लक्षात घेता त्यांना दिलासा दिला. तक्रारकर्त्यातर्फे अॅड. तुषार बारापात्रे व अॅड. तरुणकुमार बारापात्रे यांनी कामकाज पाहिले.
ग्राहक मंच : मनप्पुरम फायनान्स कंपनीला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 01:07 IST
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने मनप्पुरम फायनान्स कंपनीला तक्रारकर्त्या ग्राहकाचा ट्रक परत करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे कंपनीला दणका बसला.
ग्राहक मंच : मनप्पुरम फायनान्स कंपनीला दणका
ठळक मुद्देट्रक परत करण्याचा आदेश