शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

संविधान सन्मान यात्रा नागपुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 15:13 IST

देशभरातील ३५० जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे गेल्या २ आॅक्टोबर रोजी दांडी (गुजरात) येथून संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा गुजरात, मध्यप्रदेश मार्गे शुक्रवारी नागपुरात दाखल झाली.

ठळक मुद्देसंविधानाच्या अंमलबजावणीसाठी सत्तेसह व्यवस्था परिवर्तनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधान हे देशातील सर्व धर्म, पंथ व लोकांना एकसंध ठेवण्याचे काम करते. त्यामुळे या संविधानाच्या रक्षणाचे कार्य सरकारचे आहे. परंतु गेल्या चार वर्षात सरकार ते करीत नसल्याचे दिसून येते. उलट संविधान न मानणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे कार्य सरकारकडून होतांना दिसून येते. त्यामुळे संविधानाच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सत्तेसोबतच व्यवस्था परिवर्तनाचीही गरज असून हे परिवर्तन जनआंदोलनाच्याच माध्यमातून होईल, असा विश्वास जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे डॉ. सुनीलम् यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.देशभरातील ३५० जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे गेल्या २ आॅक्टोबर रोजी दांडी (गुजरात) येथून संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. १० डिसेंबर रोजी दिल्ली येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. ही यात्रा गुजरात, मध्यप्रदेश मार्गे शुक्रवारी नागपुरात दाखल झाली. या यात्रेदरम्यान शेतकरी, मजूर, कामगारांसह एकूणच नागरिकंच्या समस्या व त्यांच्या संविधानिक अधिकार व शासन ते कसे हिरावून घेत आहे, याबाबत जनजागृती केली जात आहे. गुजरात, मध्यप्रदेश मार्गे ही यात्रा शुक्रवारी नागपुरात दाखल झाली. यावेळी यात्रेत सहभगी झालेले मध्य प्रदेशतील किसान संघाचे डॉ. सुनीलम, प्रफुल्ल सामंतारा (भुवनेश्वर), सुनीती सु.र.(पुणे), रत्ना भर्गव, दिपक चौधरी, गुजरात येथील बुलेट ट्रेन विरोधी आंदोलनाचे कृष्णकांत आणि उत्तराखंड येथे पर्यावरण बचाव आंदोलनातील कार्यकर्ते विमलभाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.डॉ. सुनीलम् म्हणाले, सध्या संविधान धोक्यात आहे. संविधान वाचवण्याचे कार्य सरकारला करायला हवे परंतु ते करीत नसल्याने आता लोकांनाच संविधान वाचवण्यासाठी पुढे यावे लागले, म्हणून ही यात्रा काढण्यात आली आहे.सरकार कॉर्पोरेटचे गुलामसध्याचे सरकार हे कॉर्पोरेटे गुलाम झाले आहेत.अडाणीड-अंबाणींच्या हितासाठीच विकासाची धोरणे राबवली जात आहेत, त्यामुळे सरकारची विकास नितीच चुकीची आहे. तेव्हा हे सरकार सत्तेतून उखडून फेकणे सर्वात महत्वाचे आहे, असे प्रफुल्ल सामंतारा यांनी सांगितले.वैमनस्य पसरवणाऱ्यांना सरकारचा छुपा पाठिंबासध्या देशात समाजा-समजामध्य, जाती-धर्मामध्ये वैमनस्य पसरवले जात आहे, आणि ते पसरवणाऱ्यांना सरकारचा छपा पाठिंबा आहे, असा आरोप सुनीती यांनी केला.

टॅग्स :agitationआंदोलन