शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

संविधान केवळ कायद्याचा ग्रंथ नसून अधिकारांचा दस्ताऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:58 IST

संविधान हा केवळ कायद्याचा एक ग्रंथ नसून तो आपल्या अधिकारांचा दस्ताऐवज आहे. त्यामुळे आपले संविधानिक हक्क व अधिकार काय आहेत, हे समजून घेतले तर आपल्या अधिकारासाठी आपल्याला लढता येईल, तेव्हा संविधान हे प्रत्येक व्यक्तीने वाचावे,  समजून घ्यावे,  घराघरांमध्ये  ठेवावे, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ शैलेश नारनवरे यांनी येथे केले.

ठळक मुद्देप्रत्येक घरात हवे संविधान : शैलेश नारनवरे यांचे आवाहनसंविधान गौरव समारोह

आॅनलाईन लोकमतनागपूर : संविधान हा केवळ कायद्याचा एक ग्रंथ नसून तो आपल्या अधिकारांचा दस्ताऐवज आहे. त्यामुळे आपले संविधानिक हक्क व अधिकार काय आहेत, हे समजून घेतले तर आपल्या अधिकारासाठी आपल्याला लढता येईल, तेव्हा संविधान हे प्रत्येक व्यक्तीने वाचावे,  समजून घ्यावे,  घराघरांमध्ये  ठेवावे, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ शैलेश नारनवरे यांनी येथे केले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा सार्वजनिक उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानतर्फे संविधान चौक येथे संविधान गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सोमवारी अ‍ॅड. शैलेश नारनवरे हे ‘भारतीय संविधान आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार’ या विषयावर मार्गदर्शन करीत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे विभागीय उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.अ‍ॅड. शैलेश नारनवरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय परिश्रमातून संविधान तयार केले. ते केवळ एक कायद्याचे पुस्तक नाही तर तो या देशातील शोषित, वंचित, मागासवर्गीयांसह प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचविण्याचे एक ‘व्हिजन डॉक्युमेंट’आहे. संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत. शोषित, वंचितांसाठी आरक्षण दिलेले आहे. परंतु आपल्या संविधानिक अधिकारांची माहिती नागरिकांना नाही. त्यामुळे त्यांचे अधिकार डावलले जात आहेत. तेव्हा आपल्या अधिकाराच्या रक्षणासाठी प्रत्येकाने संविधानाचे वाचन करावे व ते समजून घ्यावे, तेव्हा या देशात खºया अर्थाने एक परिपूर्ण नागरिक तयार होण्यास सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी धम्मसंदेश चमूने संविधान हे पथनाट्य सादर केले. शालेय अभ्यासक्रमात संविधान शिकवावेदेशात संविधानाची संस्कृती रुजविण्यासाठी लहान वयापासूनच संविधानाची माहिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना शालेय जीवनापासून संविधान शिकविण्यात यावे, यासाठी शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश व्हावा, अशी अपेक्षाही अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी व्यक्त केली.२८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संविधान चौकात संविधान जलसा होईल. त्यानंतर भारतीय संविधान आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) या विषयावर डॉ. पी. एस. चंगोले यांचे मार्गदर्शन होईल.

टॅग्स :nagpurनागपूर