शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

संविधान संस्कृती रुजवणे काळाची गरज : पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 00:54 IST

परदेशात भारताची प्रतिष्ठा ही भारतीय संविधानामुळे असून अनेक देश भारतीय संविधानातील मूल्यांचे अनुकरण करत आहेत. विविधतेने समृद्ध असलेल्या देशाला एकसंघ ठेवण्याचे कार्य संविधान बजावत आहे. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली संविधान संस्कृती देशात रुजणे व संविधानाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन नागपूरच पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परदेशात भारताची प्रतिष्ठा ही भारतीय संविधानामुळे असून अनेक देश भारतीय संविधानातील मूल्यांचे अनुकरण करत आहेत. विविधतेने समृद्ध असलेल्या देशाला एकसंघ ठेवण्याचे कार्य संविधान बजावत आहे. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली संविधान संस्कृती देशात रुजणे व संविधानाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन नागपूरच पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी केले.केंद्रीय खाण मंत्रालयांतर्गत अंतर्गत सिव्हिल लाईन्स स्थित आय.बी.एम. (भारतीय खाण ब्युरो) मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२८ व्या जयंती महोत्सवाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खाण नियंत्रक (कंट्रोलर ऑफ माईन्स) पी. शर्मा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गौतम कांबळे उपास्थित होते.व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन प्रेम व विचारामुळे येते. महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्याने कारागृहातील कैद्यांच्याही विचारात परिवर्तन झाले, असे मत डॉ. उपाध्याय यांनी यावेळी मांडले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या ग्रंथात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संकल्पना मांडली. सायमन कमिशन, साऊथ ब्यूरो कमिटीसमोर डॉ. आबेडकर केवळ शोषित समाजाचे नेते म्हणून नव्हे तर एक विशेषतज्ज्ञ व अर्थशास्त्री म्हणून गेले होते, अशी माहिती डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाला संविधान निर्माते, समाजसुधारक असे कंगोरे असले तरी त्यांचे व्याक्तिमत्त्व शिक्षणामुळे अधिक प्रगल्भ झाले होते. त्यांचे शिक्षणविषयक विचार आज आपण आत्मसात करायला हवे, असे मत पी. शर्मा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषाणातून व्यक्त कले.यावेळी आयबीएमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती समितीचे सचिव रोकडे, बेग व आयबीएम कार्यालयाच्या विविध आस्थापनामधील कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. संचालन अशोक गवई यांनी केले.

टॅग्स :dr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीnagpurनागपूर