शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकार विरोधात काँग्रेसचा ‘जनआक्रोश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 11:38 IST

सरकारविषयी जनतेच्या मनातील आक्रोश जनतेत जाऊन मांडण्याची तयारी कॉंग्रेसने केली आहे. ३१ आॅक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत ‘जनआक्रोश’ राबविला जाणार असून नागपूर विभागाचा मेळावा ६ नोव्हेंबरला चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देचंद्रपुरात होणार विभागीय मेळावा अधिवेशनावर काढणार शेतकरी दिंडी

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील भाजप -शिवसेना युती सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आपल्या प्रगतीचा आलेख मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे. वास्तविक नोटाबंदी व जीएसटीचा सर्वच स्तरातील लोकांना फटका बसला आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली पण शेतकऱ्याना लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी संकटात आहे. राज्य सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. सरकारविषयी जनतेच्या मनातील आक्रोश जनतेत जाऊन मांडण्याची तयारी कॉंग्रेसने केली आहे. ३१ आॅक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत ‘जनआक्रोश’ राबविला जाणार असून नागपूर विभागाचा मेळावा ६ नोव्हेंबरला चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर रविवारी रविभवन येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.३१ आॅक्टोबरला अहमदनगर येथील मेळाव्याने या आंदोलनाची सुुरुवात होईल. ८ नोव्हेंबरला सांगली येथील मेळाव्याने याचा समारोप होईल. अशी माहिती विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, माजी आमदार एस.क्यू.जामा, समन्वयक सुरेश भोयर व राजेंद्र दरेकर आदी उपस्थित होते.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची रविभवन येथे बैठक घेण्यात आली. आंदोलन व्यापक स्वरुपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कीटकनाशकांच्या बळींची संख्या वाढतच आहे. याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप माणिकराव ठाकरे यांनी केला.राज्य सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरल्याने जनतेत आक्रोश आहे. काँग्रेस जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या पाठिशी उभी आहे. नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर ‘शेतकरी दिंडी’काढण्यात येणार आहे. याबातची तारीख प्रदेश काँग्रेस लवकरच निश्चित करणार असल्याची माहिती माणिकराव ठाकरे यांनी दिली.कापूस-सोयाबीनला भाव नाहीकापसला ३५०० रुपये तर सोयाबीनला २१०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. धानाचीही अशीच अवस्था आहे. कापसाला ७००० तर सोयाबीनला ५००० रुपये भाव मिळावा. राज्य सरकार उत्पादन खर्चाच्या आधारे शेतमालाचे भाव काढतात. परंतु शेतमालाचे भाव केंद्रीय कृषी मूल्य आयोग निश्चित करते. केंद्राचे भाव कमी असल्याने या भावातील फरकाची रक्कम राज्य सरकारने शेतकºयांना द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलनअधिवेशनावर शेतकरी दिंडी काढली जाणार आहे. औरंगाबाद येथून ही दिंडी निघणार असून नागपुरात तिचा समारोप होईल. या पार्श्वभूमीवर जिल्हा व तालुका स्तरावर मेळावे आयोजित करून वातावरण निर्मिती करण्यात येईल. याची तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

शिवसेनेची भूमिका दुटप्पीराज्यातील युती सरकार विषयी जनतेच्या मनात असंतोष आहे. शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. शेतकऱ्यांविषयी तळमळ असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली.१६ हजार शेतकऱ्यांची वीज तोडलीशेतकरी संकटात असतानाही थकबाकीच्या नावाखाली कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा माहवितरण कंपनीने लावला आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यातील १६ हजार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. दुसरीकडे सरकार आर्थिक संकटात असूनही राज्यातील सिमेंट रोडसाठी सल्लागाराला एक हजार कोटी देणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.रविभवन येथे विभागीय बैठकजनआक्रोश आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर नागपूर विभागातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी रविभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी माणिकराव ठाकरे , विजय वडेट्टीवार, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, पदाधिकारी बबनराव तायवाडे,एस.क्यू.जामा, सुरेश भोयर व राजेंद्र दरेकर, माजी आमदार सेवक वाघाये, अविनाश वारजूकर, बंडू सावरबांधे, अ‍ॅड. अभिजित वंजारी,चंद्रपाल चौकसे, अतुल कोटेचा, प्रफुल्ल गुडधे, संजय महाकाळकर, कुंदा राऊ त, हर्षवर्धन निकोसे, प्रकाश वसू, मुजीब पठान, संजय सिंगलकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.