लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल-डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसने आक्रमक होत ब्लॉक स्तरावर पेट्रोल पंपांपुढे आंदोलनाचे हत्यार उपसले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरवाढीने नागरिक हैराण आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल व गॅसचे दर दररोज वाढत आहेत. वरून कोरोना संक्रमणामुळे व्यवसाय ठप्प पडल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात पार पडलेल्या या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, गिरीश पांडव, डॉ. गजराज हटेवार, पंकज निघोट, राजेश पौनिकर, पंकज थोरात, युवराज वैद्य, रजत देशमुख, इर्शाद मलिक, दिनेश तराळे, विश्वेश्वर अहिरकर, प्रवीण गवरे, अब्दुल शकिल, गोपाल पट्टम, सुनिता ढोले, ज्ञानेश्वर ठाकरे, मोतीराम मोहाडीकर, संदेश सिंगलकर, राजकुमार कामनानी, युवराज शिव, मुन्ना वर्मा, राजेश उघडे, शत्रुघ्न महतो, बबलू तिवारी, सुरज शर्मा, रामभाऊ बांते, पुरुषोत्तम लोणारे, मुजीब वारसी, पप्पू चौरसिया, धरमकुमार पाटील, विजय इंगोले, शंकर देवगडे, एम.एम. शर्मा उपस्थित होते.
-------------
राजनगर येथे निदर्शने
राजनगर येथे पेट्रोल पंपापुढे डिझेल, पेट्रोल, गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. ब्लॉक अध्यक्ष प्रमोदसिह ठाकूर यांच्या नेतृत्त्वात या आंदोलनात घनश्याम मांगे, इंद्रसेन सिंह, सुभाष मानमोडे, संजय भिलकर, कविता नितनवरे, सिमरन कौर, राम कळंबे, विलास बरडे, अविनाश पाटील, न्यास अली, छाया सुखदेवे, नागेश राऊत, जगदीश गमे उपस्थित होते.
----------------
वर्धमाननगर चौकातही निदर्शने
प्रदेश काँग्रेस सचिव उमाकांत अग्निहोत्री यांच्या नेतृत्त्वात वर्धमाननगर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी अग्निहोत्री यांनी दरवाढीविरोधात केंद्र सरकारवर टिकाटिप्पणी केली. दरवाढ समाप्त होईपर्यंत काँग्रेसकडून हे आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस सचिव अतुल कोटेचा, एम.एम. शर्मा, पुरुषोत्तम लोणारे, रामू भुते, राजू चिंचोळकर, राजेश अग्रवाल उपस्थित होते.
...............