शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस ‘त्या’ नेत्यांवर ठेवणार ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:15 IST

निवडणुकांच्या काळात ‘आयाराम-गयाराम’चे वारे तर वाहू लागतातच, मात्र सोबतच पडद्यामागे राहून दुसऱ्या पक्षासाठी काम करणारेदेखील अनेक जण असतात. मागील काही काळापासून गटबाजीने ग्रस्त असलेल्या काँग्रेसने अशा नेत्यांवर विशेष लक्ष देण्याचे ठरविले आहे. अशा संशयास्पद नेत्यांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्या हालचाली काँग्रेसच्या ‘खुफिया सेल’च्या माध्यमातून टिपण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देसंशयास्पद नेत्यांची यादी तयार : पक्षविरोधी काम करणे पडणार महागात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकांच्या काळात ‘आयाराम-गयाराम’चे वारे तर वाहू लागतातच, मात्र सोबतच पडद्यामागे राहून दुसऱ्या पक्षासाठी काम करणारेदेखील अनेक जण असतात. मागील काही काळापासून गटबाजीने ग्रस्त असलेल्या काँग्रेसने अशा नेत्यांवर विशेष लक्ष देण्याचे ठरविले आहे. अशा संशयास्पद नेत्यांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्या हालचाली काँग्रेसच्या ‘खुफिया सेल’च्या माध्यमातून टिपण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.मागील पाच वर्षांत शहर काँग्रेसमध्ये बरेच वाद झाले. याशिवाय बरेच नेते भाजपाच्या मोठ्या नेत्यांच्यादेखील संपर्कात आले व त्यांनी स्वत:ची कामे करवून घेतली. खुद्द भाजपाच्या नेत्यांनी सार्वजनिकपणे हे सांगितले आहे. निवडणुकांच्या काळात हे पक्षातील ‘लाभार्थी’ नेते भाजपाची मदत करण्याची किंवा पक्षातच अंतर्गत गटबाजी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच काँग्रेसने हा निर्णय घेतला असल्याचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले. ‘हायकमांड’कडूनदेखील यासंदर्भात सूचना आल्या आहेत. आम्ही एक सविस्तर यादी तयारी केली आहे. काँग्रेसच्या अंतर्गत व्यवस्थेच्या माध्यमातून या नेत्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे एक पथकदेखील येणार असून, निवडणुकीच्या काळात सर्व हालचालींवर त्यांची नजर असेल. पक्षाविरोधात काम करणाऱ्यांविरोधातील पुरावे एकत्रित करण्यात येतील व ते ‘हायकमांड’कडे पाठविण्यात येतील. ज्या कार्यकर्त्यांना अशी माहिती मिळाली त्यांनी थेट आमच्याकडे तक्रार करण्याची सूचना आम्ही दिली आहे, असे ठाकरे यांनी प्रतिपादन केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस