शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

दरवाढी विरोधात काँग्रेसचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:45 IST

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात मंगळवारी काँग्रेसने संविधान चौकात तीव्र आंदोलन करीत असंतोषाचा भडका उडवला. संतप्त आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देत एकाएकी रस्ता रोको केला.

ठळक मुद्देरास्ता रोको, पोलिसांसोबत धक्काबुक्की : पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात मंगळवारी काँग्रेसने संविधान चौकात तीव्र आंदोलन करीत असंतोषाचा भडका उडवला. संतप्त आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देत एकाएकी रस्ता रोको केला. बळाचा वापर करून रोखण्याचा प्रयत्न करणाºया पोलिसांसोबत आंदोलकांची धक्काबुक्की झाली. या गोंधळात पोलिसांना चकमा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळही जाळण्यात आला.काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात माजी मंत्री विलास मुत्तेमवार, विशाल मुत्तेमवार, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, अ‍ॅड. अभिजिंत वंजारी, प्रशांत धवड, संदेश सिंगलकर यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवकांनी धरणे देत दरवाढीचा निषेध नोंदवला. कार्यकर्त्यांनी दरवाढीसाठी केंद्र सरकारचा निषेध करणारे, तसेच कर लादून राज्य सरकारने केलेली वाढ या विरोधात पोस्टर्स झळकविले.केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल दरवाढीची तुलनात्मक वास्तविकता मांडणारी पत्रके यावेळी वाहनचालकांना वाटण्यात आली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात कच्च्या तेलाचे दर १४० डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहचले होते. तरी त्यांनी पेट्रोलची दरवाढ नियंत्रणात ठेवली. आता पंतप्रधान मोदी यांच्या काळात कच्चे तेल ४० ते ५० डॉलर प्रती बॅरल आले असतानाही पेट्रोलचे दर ८० रुपयांवर गेले आहेत. जनतेला दिलासा देण्यात मोदी अपयशी ठरले आहेत, अशी टीका या वेळी वक्त्यांनी केली. महाराष्ट्रात विविध प्रकारचे कर आकारले जात आहेत. त्यामुळे इतर राज्याच्या तुलनेत इंधनाच्या दरात ११ रुपयांनी वाढ झालेली आहे. राज्य सरकारने लावलेले कर परत घ्यावे, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली. नेत्यांच्या भाषणानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. विकास ठाकरे यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट ढकलण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखून धरले. यामुळे कार्यकर्ते भडकले व बॅरिकेट तोडून रस्त्यावर पोहचले. गाड्या अडवून घोषणाबाजी केली. यामुळे टी पॉर्इंट पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांचा प्रतिकार केला. सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले. यामुळे तणाव निर्माण झाला होता. आंदोलनात संजय महाकाळकर, रेखा बाराहाते, सुजाता कोंबाडे, गुड्डू तिवारी, गजराज हटेवार, संजय सरायकर, प्रमोद सिंग ठाकूर, राजू भोतमांगे, ईश्वर बरडे, सुभाष मानमोडे, मनोज साबळे, मिलिंद सोनटक्के, राजू व्यास, जयंत लुटे, विक्रम पनकुले, दीपक वानखेडे, आकाश तायवाडे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, पंकज थोरात, पंकज निघोट, ईरशाद अली, अरविंद वानखेडे आदींचा समावेश होता.