शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
2
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
3
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
4
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
5
"कृपया, माझे पैसे द्या...", तान्या मित्तलने ८०० साड्यांचं पेमेंट बुडवलं? स्टायलिस्टचा गंभीर आरोप
6
TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर
7
पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
8
'अमित शाह घाबरले, त्यांचे हातही थरथरत होते...', राहुल गांधींचा गृहमंत्र्यांवर निशाणा
9
डेट फंड्सकडे गुंतवणूकदारांची पाठ! महिन्यात २५,६९२ कोटी काढले, 'या' योजनेला सर्वाधिक पसंती
10
करण जोहरची 'धुरंधर'वर प्रतिक्रिया, रणवीर सिंह अन् दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाला...
11
Arunachal Pradesh Accident: अरुणाचल प्रदेशात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला, १७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
IPO पूर्वी झुनझुनवाला कुटुंबानं 'या' कंपनीत केली ₹१०० कोटींची गुंतवणूक, अन्य २५ दिग्गजांनीचीही इनव्हेस्टमेंट
13
नवीन कामगार कायद्यांमुळे हातात येणारा पगार खरंच कमी होणार?; कामगार मंत्रालयाचा महत्त्वाचा खुलासा, सगळं गणित समजावलं
14
रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या पगारात होणार मोठी घट; शुभमन गिलला मिळणार 'बंपर फायदा'?
15
पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर १४०० कोटींचा भूसंपादन घोटाळा ! भाजपा- शिंदे सेनेच्या नेत्यांवर सुषमा अंधारेंच्या आरोपांनी खळबळ
16
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
17
Western Overseas Study Abroad IPO: पहिल्याच दिवशी IPO नं दिला झटका, आपटून ५२ रुपयांवर आला; लागलं लोअर सर्किट
18
Travel : दुबई स्वप्ननगरी! किती खर्चात होईल ५ दिवसांची शाही सफर; वाचा संपूर्ण बजेट आणि जाणून घ्या व्हिसाबद्दल..
19
Relationship Tips: बायकोला खुश कसे ठेवावे? प्रेमानंद महाराज म्हणाले, 'मी यात तज्ज्ञ नाही पण...'
20
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! BoAt कंपनीच्या कारभारात गंभीर त्रुटी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या सुरक्षेबाबत काँग्रेसची हायकोर्टात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:50 IST

नागपूर लोकसभा मतदार संघ हा सध्या संवेदनशील म्हणून गणल्या जात असल्याने, मतदारसंघात जबाबदारीने व पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रि या पार पाडणे आवश्यक आहे. यासाठी निवडणूक आयोगाने काय उपाययोजना केल्या आहेत, अशी विचारणा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शनिवारी केली आहे. यावर रविवारी उत्तर सादर करण्याचे आदेश देत, न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस जारी केली आहे.

ठळक मुद्देपारदर्शकतेसाठी काय उपाय केले : उच्च न्यायालयाची आयोगाला विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघ हा सध्या संवेदनशील म्हणून गणल्या जात असल्याने, मतदारसंघात जबाबदारीने व पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रि या पार पाडणे आवश्यक आहे. यासाठी निवडणूक आयोगाने काय उपाययोजना केल्या आहेत, अशी विचारणा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शनिवारी केली आहे. यावर रविवारी उत्तर सादर करण्याचे आदेश देत, न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस जारी केली आहे.नागपूर लोकसभेतून काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पटोले व काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी निवडणुकीसाठी आणलेल्या ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती आर. के. देशपांडे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी प्रतिवाद्यांना भारतीय निवडणूक आयोगाने स्थापित केलेल्या दिशानिर्देशांचे कठोरपणे पालन करण्याचे आवाहन करीत मुख्य निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस जारी केली. याचिकेत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त, जिल्हाधिकारी, मुंबई व नागपूरच्या मुख्य निवडणूक निरीक्षकांना प्रतिवादी करण्यात आले आहे.काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनुसार २५ ते २८ मार्चदरम्यान ईव्हीएम मशीनची प्राथमिक तपासणी करीत असताना स्ट्राँग रूमच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचे आढळून आले होते. ११ एप्रिलला होणारी निवडणूक लक्षात घेता ईव्हीएम व व्हीव्हीपॅटसंबंधी असलेल्या दिशानिर्देशांचे कठोरपणे पालन व्हावे, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने, प्राथमिक दृष्ट्या निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे राबविण्यात येत असलेल्या निवडणूक प्रक्रियेवर संशय घेण्याचे कारण दिसत नसल्याचे सांगितले.याचिकाकर्त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची दुसऱ्या स्तराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. एक किंवा दोन प्रतिनिधींद्वारे मॉकड्रीलची तपासणी करणे शक्य नसल्याने, दुसऱ्या स्तराच्या मॉकड्रीलच्या वेळी किमान २० प्रतिनिधी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मीनाक्षी अरोरा यांनी बाजू मांडली. त्यांच्यासोबत अ‍ॅड. आर.एस. अकबानी हे सहकारी होते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHigh Courtउच्च न्यायालयcongressकाँग्रेसnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019