शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
3
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
4
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
5
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
6
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
7
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
8
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
9
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
10
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
11
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
12
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
13
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
14
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
15
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
16
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
17
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
18
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
19
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
20
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला

काँग्रेस सज्ज, लाखोंच्या गर्दीची अपेक्षा

By admin | Updated: April 11, 2016 02:58 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या समारोपासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारी नागपुरात येत आहेत.

दिग्गज नेते दाखल : दिवसभर तयारीचा आढावानागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या समारोपासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारी नागपुरात येत आहेत. सायंकाळी ५ वाजता कस्तूरचंद पार्कवर या दोन्ही नेत्यांची जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी काँग्रेस नेते व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. सभेला दोन लाखावर लोक येतील, सभा यशस्वी होईल, अशी काँग्रेसजनांना अपेक्षा आहे.सभेच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण शुक्रवारपासून नागपुरात तळ ठोकून आहेत. शनिवारी दुपारी अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस दिग्विजयसिंग, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, बाला बच्चन, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र जोशी, अल्पसंख्यक विभागाचे अध्यक्ष खुर्शीद अहमद, अनुसूचित जाती विभागाचे सचिव डॉ. प्रसाद, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते नागपुरात दाखल झाले. दिवसभर नेत्यांनी तयारीचा आढावा घेतला. पुन्हा एकदा दीक्षाभूमी व कस्तूरचंद पार्कची पाहणी केली.सभेसाठी कस्तूरचंद पार्क सज्ज झाले आहे. सभोवताल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त शुभेच्छा देणारे मोठमोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. शहरातही असे होर्डिंग्ज लागले आहेत. याशिवाय सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे स्वागत करणारे बॅनरही लागले आहेत. कस्तूरचंद पार्ककडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील विजेच्या खांबावर काँग्रेसचे झेंडे लावण्यात आले आहेत. सुरक्षा यंत्रणाही सज्ज झाली असून दिवसभर सुरक्षा पथकांनी सभास्थळाची तपासणी केली.(प्रतिनिधी)शहर काँग्रेसच्या ४० टीमकस्तूरचंद पार्कवरील सभेसाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी ४० टीम तयार केल्या आहेत. या टीम मैदानावर तैनात राहतील. प्रत्येक टीममध्ये एक कॅप्टन व ४० सदस्य राहतील. सभेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकृती बिघडलेल्या व्यक्तीला मदत करणे, गोंधळावर नियंत्रण यासह सुरक्षा कवच म्हणून या चमू काम करतील. यासाठी मैदानाची ४० भागात विभागणी करण्यात आली असून त्यांना ‘स्पॉट’ नेमून देण्यात आले आहेत. शनिवारी सायंकाळी धांडे सभागृहात प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत या सर्व टीमची बैठक घेण्यात आली. या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. सराफा व्यापारी राहुल गांधींना भेटणारकेंद्र सरकारच्या धोरणाविरोधात सराफा व्यापाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून बंद पुकारला आहे. सराफा व्यापाऱ्यांनी भेटीसाठी वेळ देण्याची केलेली विनंती राहुल गांधी यांनी मान्य केली आहे. सभेनंतर रविभवन येथे सराफा व्यापारी राहुल गांधी यांची भेट घेऊन निवेदन देतील.