नेत्यांचा दावा : शांतिनगरमध्ये प्रचारयात्रानागपूर : राज्यात काँग्रेस सरकारने गेल्या १५ वर्षात सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना राबविल्या. शिक्षण, आरोग्य, रस्ते विकासासह नगरांचा कायापालट करण्यावर भर दिला. विकासाची ही गती यापुढेही कायम राहण्यासाठी काँग्रेसलाच साथ द्यावी, असे आवाहन पूर्व नागपूर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अॅड. अभिजित वंजारी यांनी केले. पूर्व नागपुरातील शांतिनगर परिसरात अभिजित वंजारी यांच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पदयात्रेपूर्वी घेतलेल्या छोटेखानी सभेत ते बोलत होते. काँग्रेसच्या शांतिनगर कार्यालयासमोरून पदयात्रेला सुरुवात झाली. पुढे पदयात्रा डॉ. पारेख हॉस्पिटल, रेल्वे लाईन, पोलीस लाईन, करुणानगर, कावरापेठ, माता मंदिर, रामसुमेर गल्ली, मारवाडी वाडी, तुळशीनगर, मुदलियार लेआऊट, नरेश पान मंदिर, ताहेरभाई गल्ली, स्विपर कॉलनी, कचरा गल्ली, जुनी पोलीस चौकी, नागोसे गल्ली, जयभीम चौक, आंबेडकर चौक, गोंडपुरा, बांगडे प्लॉट, जागृतीनगर, बजरंग चौक, मुदलियार चौक, रेल्वे कॉलनी, मोदरवाट गल्ली, फुटबॉल ग्राऊंड या परिसरातून फिरली. या दरम्यान अभिजित वंजारी यांनी घरोघरी जाऊन, लोकांचा आशीर्वाद घेतला. चौकाचौकात युवकांशी बातचित केली. महिलांना संबोधित केले. लोकांच्या समस्या जाणून घेऊन, त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. पदयात्रेत डॉ. पारेख, इर्शाद अली, निर्मला बोरकर, शौकतभाई, रिजवान खान, पंकज भानारकर, प्रकाश आकरे, विजय बोरकर, नाना झोडे, चेतन सदन, सतीश निकम, अशोक ठाकरे, चंद्रशेखर बोंद्रे, सुधाकर नेमाडे, बरकतभाई, लीलाधर नागपुरे, गुणवंता जाडे, केशव आमनेरकर, रत्नाकर जयपूरकर, शेख अशफाक, शेख शानू, देशमुख गुरुजी, शेखर बिंसार, शेख जाबीर, लियाकतभाई, मुक्ता बोंद्रे, यशोदा नौकरकर, बेबी कोल्हे, शुभांगी नौकरकर, राजगिरे, उषा उईके, उषा नौकरकर, कल्पना मेश्राम, शेख अबरार, महादेव चरडे, दीपक तेलमासरे, मोंटू नौकरकर, रणजितसिंह ठाकू र, दिनेश सेलवंटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काँग्रेसने सामान्यांचे हित जोपासले
By admin | Updated: October 6, 2014 00:51 IST