निरीक्षकांचा दरबार लागला : कार्यकर्त्यांची मते जाणून घेतलीनागपूर : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी काँग्रेसचा संभाव्य उमेदवार कोण असावा, याची चाचपणी म्हणून अ.भा. काँग्रेसचे निरीक्षक विनोद चतुर्वेदी यांनी शनिवारी देवडिया काँगे्रस भवन येथे पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व प्रमुख कार्यक र्त्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली.शहरातील सहा विधानसभा क्षेत्रातील पक्षाचे माजी मंत्री, आमदार, माजी आमदार, आजी- माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, वॉर्ड अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चतुर्वेदी यांनी चर्चा केली. दररोज दोन मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जाणार आहे. शनिवारी दक्षिण-पश्चिम व उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील कार्यक र्त्यांशी चर्चा केली. निरीक्षकांशी चर्चा करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी देवडिया भवनात गर्दी केली होती. विधानसभा निवडणुकीत कोणता उमेदवार चांगला राहील. तो का जिंकू शकेल, मतदार त्यालाच मतदान का करतील व मतदार पार्टीला मत देईल की, संभाव्य उमेदवाराला. अशा स्वरूपाचा अर्ज पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्याकडून भरून घेण्यात आला. तसेच चतुर्वेदी यांनी १५० हून अधिक कार्यक र्त्यांशी प्रत्यक्ष चर्चा केल्याची माहिती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिली. (प्रतिनिधी)उत्तरमध्ये राऊत तर द.प. मध्ये गुडधेंचा दावा निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली असता उत्तर नागपुरात रोहयो मंत्री नितीन राऊत यांच्या नावाला समर्थकांनी पाठिंबा दर्शविला. मात्र, दुसऱ्या गटाने काहीसा विरोध केला. बंडोपंत टेंभूर्णे यांनी स्वत:साठी दावा केला. दक्षिण -पश्चिम मतदारसंघात नगरसेवक प्रफुल्ल गुडधे व रेखा बाराहाते यांनी इच्छा व्यक्त केली. बहुतांश नगरसेवक, हरलेल्या उमेदवारांनी विकास ठाकरे शिफारस करतील त्यांना उमेदवारी देण्याचे मत मांडले. ठाकरे यांनी निरीक्षकाकडे गुडधे यांच्या नावाची शिफारस केली. या मतदारसंघात कुणाच्याही तक्रारी नव्हत्या.
उमेदवारीसाठी काँग्रेसची कवायत
By admin | Updated: July 13, 2014 01:00 IST