लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा फ्रंटतर्फे इतवारी शहीद चौक येथील भव्य देखाव्यांसह रॅली काढण्यात आली. ही रॅली सराफा बाजार, न्यू इतवारी रोड, बडकस चौक, महाल मार्गे काँग्रेस देवडिया भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यादरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याची शपथ घेतली.राष्ट्रीय युवा फ्रंटचे अध्यक्ष पिंटू बागडी यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी खा. गेव्ह आवारी, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, बबनराव तायवाडे, रमण पैगवार, रिंकू जैन, अंकुश बागडी, माजी खा. नरेश यादव, महेश शर्मा, महेश बागडी पाली, लता बागडी, चित्रकूट धामचे परमहंस संत हंसी बाबा, शोएब अली मीर कासीम, नंदा पराते, डॉ. यशवंत बाजीराव, डॉ. गजानन हटेवार, डॉ. रिचा जैन, स्नेहा निकोसे, किशोर गजभिये, सुजाता कोंबाडे, नरेश चौधरी, विवेक निकोसे आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली पक्ष मजबुतीची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 23:09 IST
माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा फ्रंटतर्फे इतवारी शहीद चौक येथील भव्य देखाव्यांसह रॅली काढण्यात आली. ही रॅली सराफा बाजार, न्यू इतवारी रोड, बडकस चौक, महाल मार्गे काँग्रेस देवडिया भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यादरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याची शपथ घेतली.
नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली पक्ष मजबुतीची शपथ
ठळक मुद्देइंदिरा गांधी यांना आदरांजली : राष्ट्रीय युवा फ्रंटने काढली रॅली