शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे पदाधिकारी देत आहेत शुभेच्छा : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 01:03 IST

निवडणुकांच्या काळात साधारणत: विरोधी पक्षातील नेते एकमेकांपासून दूरच राहतात. मात्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना चक्क काँग्रेसचेच पदाधिकारी फोन करून शुभेच्छा देत आहेत. खुद्द गडकरी यांनीच याबाबत जाहीरपणे सांगितले आहे. त्याचप्रमाणे विरोधकांच्या टीकेची दखल न घेण्याचीदेखील त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केली आहे.

ठळक मुद्देविरोधकांच्या टीकेची दखल न घेण्याची कार्यकर्त्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकांच्या काळात साधारणत: विरोधी पक्षातील नेते एकमेकांपासून दूरच राहतात. मात्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना चक्क काँग्रेसचेच पदाधिकारी फोन करून शुभेच्छा देत आहेत. खुद्द गडकरी यांनीच याबाबत जाहीरपणे सांगितले आहे. त्याचप्रमाणे विरोधकांच्या टीकेची दखल न घेण्याचीदेखील त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केली आहे.नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे बुधवारी गणेशपेठ येथे उद्घाटन झाले. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार दत्ता मेघे, अजय संचेती, आ. अनिल सोले, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. गिरीश व्यास, आ. नागो गाणार, महापौर नंदा जिचकार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेसचे अनेक पदाधिकारी फोन करीत आहेत. प्रचारादरम्यान मी शरीराने दुसऱ्या उमेदवारासोबत दिसलो तरी मनाने तुमच्याकडेच आहे, असे ते म्हणत आहेत. तसे पाहिले तर मी निवडणुकांची चिंताच करीत नाही. विरोधी पक्षावर किंवा त्यांच्या उमेदवारावर मी टीका करणार नाही. कार्यकर्त्यांनीदेखील टीकाटिप्पणी करू नये. केलेले कामच जनतेत घेऊन जायचे आहे. निवडणुकांच्या काळात विरोधकांकडून विविध वक्तव्ये येतील. मात्र कुणाच्याही वक्तव्यांची दखल घेऊ नका, असे गडकरी यावेळी म्हणाले. जे कामावर निवडून येऊ शकत नाहीत, ते जातीधर्माचा आधार घेतात. जातीपातीच्या राजकारणाला माझा विरोधच आहे. निवडणुकांत कुणालाही खोटे आश्वासन देण्याची गरज नाही. जे करू शकतो त्याबाबतच जनतेला सांगितले पाहिजे. नागपूरच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षांत ‘डबल इंजिन’ धावले. शहर हे पॅसेंजर ट्रेनच्या वेगाने नव्हे तर ‘बुलेट ट्रेन’प्रमाणे गतीने समोर गेले आहे, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले. संदीप जोशी यांनी संचालन केले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitin Gadkariनितीन गडकरी