नागपूर : काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याबाबत नवीन भूमिका घेतली आहे. पक्षातील तज्ज्ञांद्वारे जाहीरनामा तयार करण्याऐवजी थेट जनतेला सहभागी करून, त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात येणार आहे. यासाठी देशभर कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसच्या जाहिरनामा समितीचे समन्वयक किशोर गजभिये व प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.अ.भा. काँग्रेस कमिटीने माजी अर्थमंत्री खासदार पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षेत व खा. प्रा. राजीव गौडा यांच्या समन्वयात जाहिरनामा समिती तयार केली आहे. ही समिती देशभरात थेट जनतेपर्यंत पोहचून त्यांच्याशी सल्लामसलत करणार आहे. यासाठी समितीने पथके तयार केली असून ही पथके विविध भागात जाऊन जनतेशी विचारविनिमय करणार आहेत. ही समिती अन्न सुरक्षा व पोषण, आरोग्य, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग या पाच बिंदूवर ही सल्लामसलत करणार आहे. याअंतर्गत २९ व ३० आॅक्टोबर रोजी नागपुरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पथकामध्ये प्रा. गौडा यांच्यासह के.राजू, ताम्रध्वज साहू, बिंदू क्रिष्णा, रघुवीर मीना यांचा समावेश असणार आहे. समन्वयक म्हणून पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत, डॉ. अमोल देशमुख यांचा सहभाग असणार असल्याचे त्यांनी सांगितले. हेरीटेज लॉन, सदर येथे होणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्र व बाहेरील स्वयंसेवी संस्था, संशोधक, पत्रकार, अभ्यासक, संघटनांचे कार्यकर्ते, प्राध्यापक, समाजसेवक आदींशी संवाद साधून विचार विनिमय, सूचना, माहिती व सामग्रीचे योगदान मागविले जात असल्याचे गजभिये यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत अनिल नगरारे, त्रिशरण शहारे आदी उपस्थित होते.
जनतेच्या सल्ल्यातून काँग्रेसचा जाहीरनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 23:45 IST
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याबाबत नवीन भूमिका घेतली आहे. पक्षातील तज्ज्ञांद्वारे जाहीरनामा तयार करण्याऐवजी थेट जनतेला सहभागी करून, त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात येणार आहे. यासाठी देशभर कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसच्या जाहिरनामा समितीचे समन्वयक किशोर गजभिये व प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.
जनतेच्या सल्ल्यातून काँग्रेसचा जाहीरनामा
ठळक मुद्देआजपासून दोन दिवस समिती नागपुरात