शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेत्यांनी गांधींनाही विभागले

By admin | Updated: October 3, 2016 02:52 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला व काँग्रेसला एकसंघ केले. मात्र, नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी एकाचवेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गांधी जयंती साजरी केली.

गांधी जयंतीचे वेगवेगळे कार्यक्रम : गटबाजीचे दर्शन, कार्यकर्त्यांची परीक्षानागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला व काँग्रेसला एकसंघ केले. मात्र, नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी एकाचवेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गांधी जयंती साजरी केली. आपल्या कार्यक्रमाला कोण कोण येतात, याची जणू परीक्षाच कार्यकर्त्यांना द्यावी लागली. यासर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा काँग्रेसमधील दुफळीचे दर्शन घडले. देशात, राज्यात नव्हे तर महापालिकेतही काँग्रेस सत्तेत नाही. अशावेळी एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज असताना काँग्रेस नेत्यांनी गांधीजींचीच विभागणी केली, हे पक्षासाठी सुचिन्ह नाही, अशी प्रतिक्रिया सामान्य कार्यकर्ते व्यक्त करीत होते. काँग्रेसची शहर कार्यकारिणी जाहीर झाल्यापासून काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. माजी मंत्री राऊत समर्थकांनी विरोधकांना कार्यकारिणीत स्थान दिल्याचा मुद्दा करीत राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.तर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या समर्थकांनीही नाराजी व्यक्त केली होती. ती धुसफूस आता गांधी जयंती वेगळीवेगळी करण्यापर्यंत येऊन पोहचली. जागतिक अहिंसा दिन आयोजन समिती व नागपूर शहर काँग्रेस समितीतर्फे रविवारी सकाळी ९ वाजता व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम झाला. तर त्याच वेळी युवक काँग्रेसच्या बॅनरखाली चितार ओळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर दुसरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रदेश पालक व विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, आ. सुनील केदार उपस्थित होते. मुत्तेमवार यांच्या कार्यक्रमात काँग्रेसचे नगरसेवक, शहर पदाधिकारी उपस्थित होते. तर दुसऱ्या कार्यक्रमात चतुर्वेदी, राऊत, केदार यांच्या समर्थकांसह प्रदेश पदाधिकारीही उपस्थित होते. विशेष म्हणजे माजी खासदार गेव्ह आवारी यांच्यासारख्या काही ज्येष्ठ नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी गटबाजीला खतपाणी न घालता दोन्ही कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली. निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांमध्ये बिनसले असल्याची चर्चा व चिंता या दोन्ही कार्यक्रमांमध्ये कार्यकर्ते व्यक्त करीत होते. गांधींनी काँग्रेस व देशाला जोडले : नितीन राऊतमहात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बहुजन समाजातील सर्व जातीघटकांना एकत्र आणण्याचे काम केले. त्यामुळे हे आंदोलन संपूर्ण देशवासियांचे आंदोलन झाले. गांधीजींचे काँग्रेस पक्षावर असंख्य उपकार आहेत. नेहरू,गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता ही मुल्य देशात रुजवू शकला आणि सारा देश राष्ट्रीयत्वाच्या एका धाग्यात जोडला. या सर्वांना दिशा देण्याचे काम महात्मा गांधी यांनी केले. चितार ओळीत गांधींचा जयजयकारचितार ओळी येथे आयोजित गांधी जयंतीच्या कार्यक्रमात युवक काँग्रेसचे नेते कुणाल राऊत, शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांचा जयजयकार केला. विजय वडेट्टीवार, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, सुनील केदार यांच्याहस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या वेळी प्रदेश सचिटणीस प्रफुल्ल गुडधे, शहर निरीक्षक झिया पटेल, रवींद्र दरेकर, कमलेश समर्थ यांच्यासह सुभाष खोडे, राजेश छाबरानी, संजय खुले, नरेंद्र जिचकार, संतोष अग्रवाल, नाना झोड़े, राजेश जरगर, नीरज चौबे, विजय कदम, परमेश्वर राऊत, संजय झाडे, डॉ. रिचा जैन, राजेंद्र नंदनकर आदी उपस्थित होते. या वेळी आ. वडेट्टीवार यांनी गांधीजींच्या विचारावर चालूनच आपण जातीयवादी शक्तींचा सामना करू शकतो, असे सांगितले. चतुर्वेदी यांनी या देशात गोडसेच्या विचारांना स्थान मिळू शकत नाही, असे सांगत युवकांनी अशा शक्तींविरोधात लढण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. या वेळी नेत्यांनी महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकविण्याचा संकल्प व्यक्त केला. युवकांनी काढल्या बाईक रॅलीकुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर नागपूर युवक काँग्रेसतर्फे कमाल चौक येथून बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत धीरड पांडे, विवेक निकोसे, माधुरी सोनटक्के, असद खान, इरशाद शेख यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले. एनएसयुआयचे अध्यक्ष आमीर नुरी यांच्या नेतृत्वात संविधान चौक येथून रॅली काढण्यात आली. यात आशीष मंडपे, अभिषेक सिंग, शुभम पांडे, अंतिक राऊत, नीलेश काळे, प्रतीक कोल्हे आदी सहभागी झाले. या दोन्ही रॅली चितार ओळीत कार्यक्रमस्थळी दाखल झाल्या. व्हेरायटी चौकात गांधीजींना वंदनव्हेरायटी चौकात आयोजित कार्यक्रमात महात्मा गांधी यांना आवडणारी गीते व देशभक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी माजी खा. गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, यादवराव देवगडे, बाबुराव तिडके, हरिभाऊ नाईक, उमेश चौबे, लीलाताई चितळे, डॉ. बबनराव तायवाडे, हुकूमचंद आमधरे, अ‍ॅड. अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, महिला अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर यांच्यासह शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.